अहिल्यानगरमध्ये मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल

Published on -

अहिल्यानगर : नागापूर एमआयडीसीतील राममंदिराजवळ राहणाऱ्या एकाने मानसिक छळास कंटाळून घराच्या छतावरील वीजेच्या ताराला हात लाऊन आत्महत्या केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना १६ जून २०२५ रोजी घडली. याबाबत १ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. जितेंद्रसिंह सुरेंद्रसिंह राठोड (रा. आदर्शनगर राममंदिराजवळ नागापूर एमआयडीसी, अहिल्यानगर) असे मयताचे नाव आहे.

डिंम्पल राठोड, प्रियंका उर्फ सिंम्पल राठोड, ओनाडसिंह जयपालसिंह शेखावत (सर्व रा. गांधीनगर जयपूर राजस्थान), गजेंद्रसिंह राठोड (रा. विस्तार जनपथ जयपूर राजस्थान) असे संशयित आरोपीची नावे आहेत. याबाबत लालसिंग शेखावत (रा. आदर्शनगर नागापूर एमआयडीसी अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादीत म्हटले मयत जितेंद्रसिंह राठोड याने वरील संशयित आरोपींच्या मानसिक छळाला कंटाळून घराच्या छतावरील विजेच्या तारेला हात लाऊन आत्महत्या केली. गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!