पाथर्डी- राज्यात भारतीय जनता पक्षाला विरोधक राहिला नाही. कोणी इडी व सीबीआयच्या भीतीने गेले तर कुणी पक्षात सामील झाले. वंचित बहुजन आघाडीच प्रुमख विरोधक म्हणून भूमिका बजावत आहे. संघटना महत्वाची असते. प्रत्येक गावात वंचितचे ११ सक्रीय कार्यकर्ते तयार करून स्वाभिमानी युवकांची फौज तयार करण्याचे काम राज्यभर केले जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सदस्य तथा राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी केले.
वंचित बहुजन आघाडी पाथर्डी शहर व तालुका बैठक बुधवारी प्रा. किसन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे झाली. या वेळी अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, पाथर्डी तालुकाध्यक्ष पप्पूशेठ बोर्डे, शेवगाव तालुकाध्यक्ष शेख प्यारेलालभाई, जिल्हा संघटक रवींद्र निळ, उपाध्यक्ष सुरेश जाधव, अरुण झांबरे पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुनीता जाधव, रोहिणी ठोंबे, अनुका दराडे, मन्सूरभाई पठाण, गोरख म्हस्के, शंकर सिरसाठ, अरुण थोरात, सुनील जाधव, बाळासाहेब पंडागळे, महेंद्र राजगुरू, बाळदेव फुंदे, अनिल पवार, अनिताताई कांबळे, मिनाताई शिंदे, प्रसाद भिवसने, जिल्हा संघटक सुधीर ठोंबे, साईनाथ बोर्डे, देविदास भारसकर, आनंद उबाळे, सूरज क्षेत्रे, दत्ता साळवे, आबिद शेख, दत्ता सातपुते, अनिल बोर्डे, भीमराज शिंदे, आकाश शिंदे तसेच महिलांसह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी शहर व तालुक्यातील नवीन कार्यकारिणीकरिता पाथर्डी शहर व तालुक्यातील फादर बॉडी, युवा आघाडी, महिला आघाडीचे फॉर्म भरून घेण्यात आले. याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष योगेश साठे, तालुकाध्यक्ष पप्पूशेठ बोर्डे, तालुका महासचिव संजय कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सूत्रसंचालन आकाश शिंदे यांनी केले. आभार संजय कांबळे यांनी मानले.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत समविचारी पक्षांशी चर्चा करू. त्यांनी सन्मानाने जागा वाटप केल तर एकत्रीत निवडणूक लढू. मात्र, वंचितला योग्य स्थान दिले नाही तर स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील. पक्षाच्या नेत्यांनी दिलेले आदेश पाळले जातील. आता ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. जे येतील त्यांना सोबत घेऊ अन्यथा वंचित बहुजन आघाडी कोणाला निवडून आणायचे व कोणाला पाडायचे, याचा राजकीय हिशोब करील.
-पप्पुशेठ बोर्डे, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, पाथर्डी.