Ladki Bahin Yojana : गेल्या वर्षी जून महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातील अशी घोषणा महायुती सरकारने केली. त्यानंतर लगेचच याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि जुलै महिन्यापासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळू लागला.
जुलै 2024 पासून या योजनेच्या पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत आणि आत्तापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना एकूण 12 हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत म्हणजेच ही योजना सुरू होऊन आता बारा महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे.

या योजनेअंतर्गत आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2024 आणि जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 2025 या कालावधी मधील एकूण 12 हप्ते मिळाले आहेत.
या योजनेचा बारावा हप्ता म्हणजेच जून महिन्याच्या हप्त्यासाठी 30 जून 2025 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 3600 कोटी रुपयांच्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे. यानुसार 30 जून पासून या योजनेचा बारावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे. तर दुसरीकडे या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतही आता मोठी अपडेट हाती आली आहे.
जुलै महिन्याचा हप्ता या तारखेला खात्यात येणार
मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास देखील जुलै महिना उजाडला आहे. यामुळे जुलै महिन्याचा लाभ कधी मिळणार, जुलैचा तेरावा हप्ता मिळण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडणार की काय ? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा लाभ जुलैमध्येच दिला जाईल असा दावा केला जातोय. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जुलै महिन्याचा लाभ या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो.
नक्कीच यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, आता आपण लाडक्या बहिणींना जून महिन्याचे पैसे दिले जात असल्याने हा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा झाला आहे की नाही हे कसे चेक करायचे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
1500 रुपये खात्यात जमा झालेत की नाही कस चेक करणार ?
लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ? हे जर तुम्हाला चेक करायचे असेल तर यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय उपलब्ध आहेत.
तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन खात्यात पैसे जमा झालेत की नाही हे चेक करू शकता. जर तुम्हाला ऑनलाईन चेक करायचे असेल तर तुम्ही बँकेच्या अधिकृत एप्लीकेशनवर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता.
याशिवाय फोन पे सारख्या युपीआय एप्लीकेशनच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकता. एवढेच नाही तर तुम्ही मिस कॉल देऊनही तुमच्या खात्यातील बॅलन्स चेक करू शकता. जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने बॅलन्स चेक करायचा असेल तर यासाठी तुम्हाला तुमच्या बँक शाखेत जावे लागणार आहे.
तुम्ही तुमच्या बँकेत गेल्यानंतर तिथे तुम्हाला पासबुक प्रिंट करून घ्यायचे आहे. पासबुक एन्ट्री केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले आहेत की नाही याची एन्ट्री दिसणार आहे.