OnePlus चा 5500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरावाला फोन झाला स्वस्त, धमाका ऑफर फक्त 8 जुलैपर्यंतच!

Published on -

OnePlus ने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाका डील आणली आहे. 8 जुलै रोजी लाँच होणाऱ्या नवीन OnePlus Nord CE5 5G च्या आधीच कंपनीने त्याच्या मागील मॉडेलवर जबरदस्त सूट जाहीर केली आहे. OnePlus Nord CE4 5G, जो काही महिन्यांपूर्वी 24,999 रुपयांना लाँच झाला होता, आता तब्बल 3,500 रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येत आहे. म्हणजेच, सध्या तुम्ही तो फक्त 21,499 रुपयांना फ्लिपकार्टवरून घेऊ शकता.

OnePlus Nord CE4 5G

या डीलची खासियत म्हणजे त्यात कुठलीही अट नाही. तुम्हाला सहजपणे, सरळ डिस्काउंट मिळतोय. 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला हा फोन, OnePlus च्या चाहत्यांसाठी म्हणजे एक सुवर्णसंधीच आहे. त्यात आणखी फायदा हवा असेल, तर Axis बँकेच्या कार्डवर 750 रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील मिळू शकतो. आणि जर तुम्हाला एक्सचेंज ऑफरची आस असेल, तर Amazon वरून खरेदी केल्यास तुम्हाला 15,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूटही मिळू शकते.

OnePlus Nord CE4 5G चे फीचर्स बघितल्यास, तो अगदी प्रीमियम फोनची अनुभूती देतो. 6.7 इंचांचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि 2,100 निट्स पीक ब्राइटनेससह येतो. त्यामुळे व्हिडिओ बघणं, गेम खेळणं किंवा सोशल मीडियावर स्क्रोल करणं हा अनुभव भन्नाट मिळतो. HDR10+ सपोर्टमुळे व्हिज्युअल्स अगदी जिवंत वाटतात.

कॅमेरा डिटेल्स आणि कनेक्टिव्हिटी

फोनच्या आत आहे MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर, जो केवळ 5G कनेक्टिव्हिटीसाठीच नाही, तर मल्टीटास्किंग आणि गतीशील परफॉर्मन्ससाठीही जबरदस्त आहे. यामध्ये 50MP चा OIS सपोर्ट असलेला प्रायमरी कॅमेरा असून 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी समर्थ आहे. सोबत 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 16MP सेल्फी कॅमेरा आहे, जो व्हिडिओ कॉलिंग आणि नाईट मोडसाठी योग्य ठरतो.

बॅटरीसुद्धा याच्या खास वैशिष्ट्यांपैकी एक आहे. 5,500 mAh क्षमतेची बॅटरी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट करते, ज्यामुळे हा फोन अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण चार्ज होतो आणि दिवसभर सहज टिकतो.

OnePlus Nord CE4 5G Android 14 आधारित OxygenOS 14 वर चालतो, आणि कंपनीकडून 3 वर्षांपर्यंत OS आणि सिक्योरिटी अपडेट्सची खात्री दिली जाते. म्हणजेच, एकदा घेतलात तर पुढील काही वर्षं काळजी न करता वापरता येईल.

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा फोन सर्व काही देतो 5G, Wi-Fi 5, Bluetooth 5.1 आणि USB Type-C पोर्ट. अशा जबरदस्त वैशिष्ट्यांसह हा फोन आता 20,000 च्या आसपास मिळतो आहे, त्यामुळे ही डील चुकवू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!