Amazon Prime Day सेलमध्ये स्मार्टटीव्ही खरेदी करा ‘हाफ प्राइस’ मध्ये; लिस्टमध्ये Sony ते Samsung अशी मोठी नावे!

Published on -

अॅमेझॉनवरील वर्षातील सर्वात मोठा सेल Amazon Prime Day Sale अगदी काही दिवसांतच सुरू होतोय आणि यंदाच्या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. विशेषतः Sony आणि Samsung या जगप्रसिद्ध ब्रँड्सचे 4K स्मार्ट टीव्ही आता मोठ्या सवलतीत मिळत आहेत, त्यामुळे खरेदीसाठी ही मोठी संधी ठरणार आहे.

12 जुलैपासून सुरू होणाऱ्या या सेलमध्ये Sony आणि Samsung चे 43 आणि 55 इंचाचे टीव्ही तब्बल ₹२24,000 पर्यंत कमी किमतीत विकले जातील.

Sony BRAVIA 2

 

Sony BRAVIA 2 चा 55 इंचाचा अल्ट्रा HD स्मार्ट टीव्ही सध्या सर्वात चर्चेत आहे. याची मूळ किंमत होती ₹74,990, पण Prime Day मध्ये तो फक्त ₹50,990 मध्ये मिळणार आहे. शिवाय, जर तुम्ही SBI कार्ड वापरून पेमेंट केलंत, तर तुम्हाला 10% अधिक सूट मिळू शकते, म्हणजेच आणखी बचत. या टीव्हीमध्ये Google TV, Chromecast, Alexa, Apple AirPlay यांसारखी सर्व आधुनिक फीचर्स आहेत. 4K रिझोल्यूशनसह क्रिस्टल क्लियर पिक्चर क्वालिटी आणि Dolby Atmos साउंड आउटपुट यामुळे सिनेमॅटिक अनुभव घरीच मिळतो. त्यात 20W साउंड आणि बास रिफ्लेक्स स्पीकर्सही आहेत.

Samsung 4K Vista Pro Smart TV

दुसरीकडे, Samsung चा 43 इंच 4K Vista Pro Smart TVसुद्धा उत्तम पर्याय आहे, खासकरून ज्या ग्राहकांचं बजेट थोडं कमी आहे. हा टीव्ही ₹34,490 च्या लाँचिंग किमतीवर बाजारात आला होता. पण Prime Day मध्ये तो फक्त ₹26,999 मध्ये मिळणार आहे, म्हणजे थेट ₹7,491 ची सूट. SBI कार्ड वापरल्यास इथेही 10% इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.

Samsung चा हा टीव्ही 4K क्रिस्टल प्रोसेसर, HDR 10+, 20W RMS अडॉप्टिव्ह साउंड, Q‑Symphony आणि OTS Lite साउंड टेक्नॉलॉजीसह येतो. गेमिंगसाठीही हा टीव्ही योग्य आहे, कारण त्यात Auto Low Latency Mode (ALLM), HGiG सपोर्ट आणि HDMI 3 पोर्ट्ससारखे फीचर्स दिले गेले आहेत.

या ऑफर्स केवळ चांगल्या डील्स नाहीत, तर खरेदीदारांसाठी एक खऱ्या अर्थाने “अपग्रेडचा क्षण” आहेत. त्यात नेटफ्लिक्स, Prime Video, YouTube, Disney+ Hotstar आणि इतर सर्व ओटीटी अ‍ॅप्सचा सपोर्टही असल्यामुळे, टीव्ही केवळ मनोरंजनच नाही तर स्मार्ट होमचा भागही बनतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!