चंदनच नाही तर भारतातील 99% लोकांच्या घरापुढील ‘ही’ 2 झाडे सापांना देतात आयत निमंत्रण !

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो विशेषता ग्रामीण भागात सापांचा धोका अधिक असतो. खरे तर साप काही वनस्पतींकडे आकर्षित होतात आणि आज आपण अशाच दोन झाडांची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Snake Viral News : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि सगळीकडे अगदीच अल्हाददायक वातावरण तयार झाले आहे. निसर्ग हिरवी शाल पांघरून तयार झाला आहे. सगळीकडे हिरवळ पाहायला मिळत आहे. यामुळे मन अगदीच प्रसन्न होते पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मानवी वस्तीमध्ये साप शिरण्याचा देखील धोका असतो यामुळे या काळात सापांचा धोका पाहता विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

खरे तर भारतात सापांच्या फारच मोजक्या जाती विषारी आहेत. पण असे असतानाही देशात दरवर्षी हजारो लोकांचा सर्पदंशामुळे मृत्यू होतो. यामुळे साप डोळ्याला दिसला तरीही आपली पायाखालची जमीन सरकते.

पण तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की आपल्या घराजवळ असणाऱ्या काही झाडांकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. दरम्यान आज आपण अशाच दोन झाडांची माहिती पाहणार आहोत ज्याकडे साप आकर्षित होतात.

खरे तर चंदन हे एक असे झाड आहे ज्याकडे साप मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात आणि यामुळेच घराजवळ चंदनाची लागवड करू नये असे काही लोकांचे म्हणणे आहे. दरम्यान आज आपण चंदन सोडून अशा दोन झाडांची माहिती पाहणार आहोत ज्यामुळे साप तुमच्या घरात घुसण्याची भीती असते.

या दोन झाडांकडे साप आकर्षित होतात 

चाफ्याचं झाड : चाफा ही एक सुगंधी वनस्पती आहे. चाफ्याच्या फुलांना असणारा सुगंध अनेकांना आवडतो. यामुळे अनेक जण आपल्या घराजवळच या झाडाची लागवड करतात. पण, चाफ्याच्या झाडांवर पक्ष्यांची घरटी सुद्धा असतात, यामुळे ही पक्ष्यांची अंडी किंवा पिल्लं खाण्यासाठी साप या झाडाजवळ येऊ शकतात.

जर चाफ्याच्या झाडाखाली दगड धोंडे असतील किंवा अडचण असेल तर अशा अडचणीच्या ठिकाणी साप लपून बसू शकतात. यामुळेच हे झाड जर तुमच्या घराजवळ असेल तर या झाडा जवळून जाताना तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी. किंवा मग या झाडाची लागवड करणे टाळायाला हवे. 

केवड्याचं झाड : केवडा ही एक सुगंधी वनस्पती आहे. केवड्याची फुले फारच सुगंधी असतात आणि म्हणूनच अनेक जण आपल्या घरा शेजारी या झाडांची लागवड करतात. घराच्या अंगणात, परसबागेत तसेच हॉटेल दुकान यांसारख्या ठिकाणी देखील केवड्याचे झाड आपल्याला पाहायला मिळते.

पण हे झाड लावलं तर आपण सापांना आयता निमंत्रण देऊ शकतो. कारण हे झाड सापांचं आवडत ठिकाण आहे असा दावा केला जातो. या झाडाच्या दाट पानांमध्ये आर्द्रता आणि गारवा असतो, हेच कारण आहे की साप या झाडाजवळ तसेच त्याच्या पानात लपून राहतात.

केवड्याच्या झाडाजवळ साप आढळून येतात असे अनेकांनी सांगितले आहे पण असे असले तरी आजही अनेक जण केवढ्याला असणारा सुगंध पाहता घराच्या पुढे याची लागवड करतात. दरम्यान जर तुमच्याही घरापुढे हे झाड असेल तर तुम्ही या झाडा जवळून जाताना विशेष काळजी घ्यायला हवी. झाडाजवळील परिसर नेहमीच स्वच्छ ठेवायला हवा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!