आपण देवाचे नाव फक्त पैशासाठी घेतले तर काय होईल? हा प्रश्न काहीसा कठीण वाटू शकतो, पण उत्तर मात्र अगदी सरळ आणि खोल अर्थाने भरलेलं आहे. वृंदावनातील संत प्रेमानंद महाराजजींनी यावर दिलेलं उत्तर ऐकून मन नक्कीच हलकं होतं. एका भक्ताने महाराजजींना असा प्रश्न विचारला होता की, “जर मला ईश्वरप्राप्तीची इच्छा नसेल, आणि मी फक्त पैशासाठी नामजप केला, तर काय होईल?” यावर महाराजजींनी जे उत्तर दिलं, त्यात फक्त तत्वज्ञान नव्हे तर प्रत्यक्ष जीवनाचा अनुभवही दडलेला होता.

काय म्हणाले महाराज?
या भक्ताच्या प्रश्नाला महाराजजींनी अगदी सहजतेने उत्तर दिलं “मग दोन्ही मिळेल. देवदर्शनही आणि धनसंपत्तीदेखील.” हे ऐकून थोडंसं आश्चर्य वाटतं, पण महाराजजींचं स्पष्टीकरण त्याहून अधिक प्रभावी होतं. त्यांनी सांगितलं की, “फक्त नाव घेणं देखील कार्य करतं, कारण नावामध्ये शक्ती आहे.
माझं स्वतःचं उदाहरण बघा, एकेकाळी माझ्याकडे भाकरीचा एक तुकडाही नव्हता, राहायला घर नव्हतं, बोलायला कोणी नव्हतं. पण आज तुम्ही पाहताय, हजारो लोक राधे-राधे म्हणत मला भेटायला येतात.”
म्हणजेच महाराजजींचं असं म्हणणं असं आहे की, जरी सुरुवात केवळ सांसारिक इच्छांसाठी झाली, तरी निस्वार्थ भावनेनं नामजप सुरू राहिला, की तोच नामजप तुम्हाला अध्यात्माच्या दिशेने नेतो. कारण देव हे केवळ मांगणाऱ्यांचे नव्हे, तर सगळ्यांचे पालनकर्ते आहेत.
नामजपमध्ये असते मोठी ताकद
त्यांच्या शब्दांमधून हेही लक्षात येतं की, आपण देवाच्या नावाशी जोडले गेलो की, ते नाव आपली दिशा बदलतं. महाराजजींचं म्हणणं आहे, “जर मी देवाशी जोडलेलो नसतो, तर आज कोणीही मला राधे-राधे म्हणालं नसतं. मला जो काही सन्मान आणि वैभव मिळालं आहे, ते केवळ देवाच्या कृपेने.”
त्यांनी असंही स्पष्ट केलं की, “जर तुम्ही देवाचं नाव प्रामाणिकपणे घ्याल, तर जो देव एका क्षणात संपूर्ण ब्रह्मांड निर्माण करू शकतो, तो तुमच्यासाठी सुख-सुविधा निर्माण करायला का मागं-पुढं पाहील?”
शेवटी त्यांनी सांगितलं की, देव फक्त मोक्षाचा मार्ग नाही, तर या जगातला मार्गदर्शक आहे. जर तुम्ही नामजप करत राहिलात, तर एक दिवस तुमचं हृदयच शुद्ध होईल आणि पैशाच्या मागे धावणं नव्हे, तर समाधान मिळवणं ही खरी समृद्धी आहे, हे तुमचं स्वतःचं मन समजेल.