Airtel यूजर्ससाठी बंपर ऑफर! नेटफ्लिक्स, प्राईम मोफत…आणि दररोज 3GB डेटा; 84 दिवसांचे स्वस्त प्लॅन्स झाले लाँच

Published on -

जर तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर वेगवान इंटरनेटसह दर्जेदार मनोरंजन हवे असेल, तर एअरटेलने काही भन्नाट प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत जे तुमच्या वेळेला अधिक रंगतदार बनवू शकतात. आज आपण अशाच काही प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.

जे केवळ भरपूर डेटा देतात असं नाही, तर नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि हॉटस्टारसारख्या ओटीटी अॅप्सचा मोफत अॅक्सेस देखील पुरवतात. इतकंच नाही तर, अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळते.

1,798 रुपयांचा प्लॅन

सर्वात आधी बोलूया 84 दिवसांच्या कालावधीसाठी असलेल्या प्लॅनबद्दल. जर तुम्ही जरा अधिक खर्च करण्याची तयारी ठेवलीत, तर 1,798 रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा दिला जातो आणि नेटफ्लिक्स बेसिकचे सबस्क्रिप्शनही मोफत मिळते. सतत प्रवासात असणाऱ्यांसाठी, कंटेंट बिंजवॉच करणाऱ्यांसाठी आणि व्हिडिओ कॉलिंग करणाऱ्यांसाठी हा प्लॅन खूपच उपयोगी ठरतो.

1,199 रुपयांचा प्लॅन

त्याचबरोबर, 1,199 रुपयांचा प्लॅन देखील आहे, ज्यामध्ये दररोज 2.5GB डेटा मिळतो आणि अॅमेझॉन प्राइम लाइटचा अॅक्सेस देखील मिळतो. जर तुम्ही प्राइमवर सीरिज आणि शॉपिंग दोन्हीचा आनंद घेणाऱ्यांपैकी असाल, तर हा प्लॅन तुमच्यासाठी एकदम योग्य.

1,029 रुपयांचा प्लॅन

कंपनीने आणखी एक खास प्लॅन दिला आहे 1,029 रुपयांचा. यात 84 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा आणि जिओ हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन मिळते. क्रिकेटप्रेमी आणि हॉटस्टारवरचे लाईव्ह शो बघणाऱ्यांसाठी हा प्लॅन खूपच फायदेशीर ठरतो.

838 रुपयांचा प्लॅन

कमी कालावधीच्या प्लॅनबाबत बोलायचं झालं, तर 838 रुपयांचा प्लॅन 56 दिवसांची वैधता देतो. यात दररोज 3GB डेटा आणि अॅमेझॉन प्राइम लाइटचा अॅक्सेस दिला जातो. 598 रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स बेसिक आणि हॉटस्टारसह 2 GB डेटा दररोज दिला जातो आणि 28 दिवस वैधता मिळते.

449 रुपयांचा प्लॅन

तर 449 रुपयांचा सर्वात कमी खर्चिक प्लॅन देखील ओटीटी प्रेमींसाठी खास आहे. यात 28 दिवसांसाठी 3GB दररोज डेटा आणि सोनी लिव्हसह 22 पेक्षा अधिक अॅप्सचा अॅक्सेस मिळतो. अमर्यादित कॉलिंगची सुविधा तर प्रत्येक प्लॅनसोबत आहेच.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!