Maharashtra Police Bharati : देशसेवेची, राष्ट्रसेवेची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी ज्या तरुणांना पोलीस व्हायचे असेल त्यांच्यासाठी अधिक खास ठरणार आहे कारण की महाराष्ट्रात लवकरच एक मोठी पोलीस भरती होणार आहे.
खरंतर राज्यात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थींची संख्या फारच उल्लेखनीय आहे. गावागावातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत.

दरम्यान याच लाखो परीक्षार्थींसाठी आता एक गुड न्यूज समोर आली आहे ती म्हणजे लवकरच महाराष्ट्रात दहा हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली जाणार आहे. दरम्यान आज आपण याच पोलीस भरतीच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कधी निघणार मेगा भरती
मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्यात दहा हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असून या अनुषंगाने एक प्रस्ताव देखील तयार करण्यात आला आहे.
या दहा हजार पदांच्या पोलीस भरतीच्या मान्यतेसाठी गृह विभागाला नुकताच एक प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे.
दरम्यान गृह विभागाकडून या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर ऑक्टोबर महिन्यात दहा हजार पदांसाठी पोलीस भरती आयोजित केले जाणार असून या पदभरती अंतर्गत राज्यातील हजारो तरुणांचे खाकी वर्दी घालण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
कोणत्या पदांसाठी होणार भरती ?
खरे तर अजून पोलीस भरती जाहीर झालेले नाही पण मीडिया रिपोर्ट मध्ये असे म्हटले जात आहे की या दहा हजार पदांच्या भरती प्रक्रिया अंतर्गत बँड्समन, चालक शिपाई, पोलिस शिपाई, राज्य राखीव पोलिस बलातील अंमलदार या पदांची भरती केली जाणार आहे.
या पदभरती अंतर्गत सुरुवातीला मैदानी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर मग राजधानी मुंबई वगळता सर्वत्र एकाच वेळी लेखी परीक्षा आयोजित केली जाईल अशी माहिती समोर येत आहे.
एका पदासाठी एकच अर्ज करता येणार
या आगामी पदभरती मध्ये उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार अशी माहिती सुद्धा यावेळी समोर आली आहे. या पद भरतीसाठी उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. यामुळे उमेदवार ज्या जिल्ह्यातून आहेत त्याच जिल्ह्यातून अर्ज करता येणार असे सांगितले जात आहे.