नेटवर्कशिवाय कॉलिंग? Tecno चा भन्नाट फीचर्सवाला स्मार्टफोन उद्या होतोय लाँच! ड्युअल सिम, डॉल्बी अॅटमॉस आणि तब्बल 6000mAh बॅटरी मिळणार

Published on -

नवीन फोन खरेदी करायचाय आणि लुकबाबत कुठलाही तडजोड करायचा नाहीये? मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. Tecno कंपनी उद्या, 4 जुलै रोजी, आपल्या ‘Pova 7 5G’ सिरीजमधील स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर करणार आहे. पण हा फोन इतरांपेक्षा वेगळा आहे. कारण तो केवळ स्टायलिश आणि दमदार फीचर्ससह येत नाही, तर त्यात असणार आहे अशी खास गोष्ट जी अनेकांचं लक्ष वेधून घेईल, ती म्हणजे नेटवर्कशिवायही या फोनमध्ये संवाद साधता येईल. हे ऐकून नवल वाटतंय ना? पण हीच या फोनची खरी ताकद आहे.

Tecno Pova 7 5G

Tecno ने या नव्या फोनमध्ये एक अत्याधुनिक ‘डेल्टा लाईट इंटरफेस’ दिलं आहे, ज्यात एक खास प्रकारचा व्हिज्युअल इफेक्ट दिसतो. यामागचं तत्त्व अगदी सोपं आहे, जेव्हा एखादं गाणं प्ले होतं, व्हॉल्यूम बदलतो किंवा नोटिफिकेशन येतं, तेव्हा हा लाईट एलिमेंट चमकतो. त्यात एक स्टायलिश टचही आहे आणि वापरातही मजा येते. हा फिचर तरुणांना विशेष आवडण्याची शक्यता आहे.

या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो नेटवर्क नसतानाही संवाद साधण्याची सोय देतो. Tecno चं म्हणणं आहे की, ‘इंटेलिजेंट सिग्नल हब’ नावाची प्रणाली वापरून कमी नेटवर्क असलेल्या ठिकाणीही या फोनचं कनेक्टिव्हिटी परफॉर्मन्स चांगलं राहील. त्यामुळे जे लोक गावी, जंगलात किंवा डोंगराळ भागात फिरतात, त्यांच्यासाठी हा फोन एकदम उपयुक्त ठरू शकतो.

यामध्ये Tecno ने ‘Ella’ नावाचा स्वतःचा व्हॉइस असिस्टंट दिला आहे, जो केवळ इंग्रजी किंवा हिंदीत नाही, तर मराठी, गुजराती आणि तमिळ भाषांमध्येही काम करतो. त्यामुळे आपल्या मातृभाषेत संवाद साधण्याची सवय असलेल्या वापरकर्त्यांसाठी हा फोन अधिक जवळचा वाटेल. फोनमध्ये ‘मेमफ्यूजन’ नावाचं एक फीचर आहे, ज्याच्या मदतीने जास्त RAM लागल्यास स्टोरेजमधून थोडी जागा उधार घेऊन फोन आणखी स्मूद चालतो.

बॅटरी आणि कॅमेरा

या फोनमध्ये 6,000mAh क्षमतेची मोठी बॅटरी असेल, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. म्हणजे फक्त काही मिनिटांत फोन फुल चार्ज होईल आणि तुम्ही पुन्हा तुमचं आवडतं म्युझिक, गेमिंग किंवा व्हिडिओजमध्ये रममाण होऊ शकता.

Tecno Pova 7 5G तीन रंगांत येणार आहे ब्लॅक, ग्रीन आणि सिल्व्हर. त्याची रचना आणि डिझाइन दोन्ही खूप आकर्षक असून तो हाती घेतल्यावर लगेच लक्ष वेधून घेईल. शिवाय फोनला IP64 रेटिंग, ड्युअल सिम सपोर्ट, डॉल्बी अॅटमॉस, NFC, IR रिमोट आणि Bluetooth 5.4 सारखे फिचर्सही मिळाले आहेत.

Tecno कडून अद्याप या सिरीजमधील संपूर्ण मॉडेल्सची यादी जाहीर झाली नाही, पण सूत्रांनुसार यामध्ये कमीत कमी चार फोन असण्याची शक्यता आहे Pova 7 5G, Pova 7 Pro 5G, Pova 7 Ultra 5G आणि Pova 7 Neo.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!