कोणत्याही महिन्याच्या ‘या’ 3 तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनीदेवाची असते विशेष कृपा ! वयाची 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळते जबरदस्त यश

अंकशास्त्रात असे सांगितले गेले आहे की कोणत्याही महिन्याच्या तीन विशिष्ट तारखांवर जन्मलेल्या लोकांना वयाची तीस वर्षे पूर्ण केल्यानंतर जबरदस्त यश मिळते. या लोकांवर शनि देवाची कृपा असते. 

Published on -

Numerology Secrets : वैदिक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या राशीवरून त्याचे भविष्य सांगितले जाते. व्यक्तीच्या राशीवरून त्याचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व सुद्धा समजत असते. याचप्रमाणे अंकशास्त्रातून व्यक्तीच्या जन्मतारखेवरून सुद्धा त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमानकाळ सांगितले जाऊ शकते. खरे तर अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचाच एक भाग आहे.

अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मुलांकाच्या आधारावर त्या व्यक्तीचा स्वभाव व्यक्तिमत्व त्याच्या आवडीनिवडी या सर्व गोष्टींचा उलगडा होतो. मुलांक हा एक ते नऊ दरम्यान असतो.

अशा परिस्थितीत आज आपण अशा एका मुलांकाची माहिती जाणून घेणार आहोत जे की वयाची 30 वर्षे पूर्ण झाल्यानंतर यशस्वी होतात. या अशा लोकांना आयुष्यातील सुरुवातीचे दिवस संघर्ष करावा लागतो मात्र तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक अगदीच राजासारखे आयुष्य जगतात. 

मुलांक कसा निघतो? 

मुलांक हा व्यक्तींच्या जन्मतारखेवरून काढला जातो. व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक निघतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याचा 31 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलाखत  3+1 = 4 राहणार आहे.

जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 23 तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक हा 2+3=5 असतो. जर कोणत्याही महिन्याच्या 19 तारखेला जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक 1+9=10 आणि परत 1+0 = 1 असतो. म्हणजे मुलांक हा 1 ते 9 यादरम्यानचा एक अंक असतो. 

मुलांक 8 असणारे लोक कसे असतात?

आज आपण अशा एका मुलांकाची माहिती जाणून घेणार आहोत ज्या लोकांवर शनि देवाची विशेष कृपा असते. आम्ही ज्या मुलांकाबाबत बोलत आहोत तो आहे मुलांक 8. मुलांक 8 म्हणजे कोणत्याही महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर यापैकी कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक.

या लोकांचा स्वामीग्रह शनी असतो यामुळे या लोकांवर शनी देवाची विशेष कृपा असते. या लोकांचे धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यात विशेष मन रमते. पण आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात या लोकांना मोठ्या अडचणींचा सुद्धा सामना करावा लागतो.

आयुष्याच्या सुरुवातीला हे लोक मोठा संघर्ष करतात पण या संघर्षाचे फळ म्हणून या राशीच्या लोकांना वयाच्या तीशी नंतर चांगले आयुष्य मिळते. यामुळे मात्र असे आढळले आहे की अनेकदा या मुलांकाचे लोक हिंमत हारतात.

या लोकांवर न्यायदेवता शनिदेव विशेष प्रसन्न असतात यामुळे जर या लोकांनी योग्य मेहनत घेतली तर त्यांना चांगले यश मिळते आणि ते प्रचंड श्रीमंत सुद्धा होतात. सुरुवातीच्या टप्प्यात या लोकांना संघर्ष करावा लागत असला तरी देखील एक वेळा असा येतो जेव्हा या लोकांना कोणत्याच गोष्टींची कमतरता राहत नाही.

या लोकांना वयाची 30 किंवा 40 वर्षे पूर्ण झाल्यानंतर यश मिळते. एकदा यशस्वी झालेत की मग हे लोक मागे वळून बघत नाहीत, नंतर ते अगदीच राजासारखे आयुष्य जगतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!