एखाद्या व्यक्तीचे स्वभाववैशिष्ट्य आणि त्याचे अंतर्गत गुणधर्म जाणून घ्यायचे असतील, तर केवळ त्याचं बोलणं किंवा वागणं पाहून आपण लगेच निष्कर्ष काढतो. पण खरं पाहिलं तर, व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य वागणूक नसून, त्यामागे दडलेला एक खोल, गुंतागुंतीचा आणि अनेक अनुभवांनी बनलेला प्रवास असतो. हेच व्यक्तिमत्त्व अनेकदा आपल्या शरीरातील काही भागांतून दिसून येते, विशेषतः तळहातावरून.

हातातील रेषा आणि तळहाताचा पोत केवळ हस्तरेषा शास्त्रासाठी नाही, तर एका व्यक्तीच्या वृत्तीचं, संघर्षाचं, आणि स्वभावाचा आरसाच बनू शकतात. अनेक शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ यावर अभ्यास करत आले आहेत की तळहातावर असलेल्या रेषा आणि हाताचा पोत यावरून व्यक्तीच्या जीवनशैलीबद्दल, निर्णयक्षमतेबद्दल आणि भावनिक संतुलनाबद्दल खूप काही सांगता येतं.
कमी रेषा
उदाहरणार्थ, ज्या लोकांच्या तळहातावर फारशा रेषा नसतात, त्यांचा स्वभाव बहुधा संथ, काहीसा आळशी आणि निर्णय घेण्यात संकोच करणारा असतो. ते सहजासहजी एखाद्या गोष्टीचा निर्णय घेत नाहीत, आणि घेतलाच तरी त्यावर अंमलबजावणी करण्यात खूप वेळ लावतात. अशा व्यक्ती आयुष्यात संधी गमावू शकतात कारण त्या वेळेत पुढचा माणूस पुढे निघून गेलेला असतो.
कठोर हात
दुसरीकडे, जे लोक कठोर हातांचे असतात, त्यांचं व्यक्तिमत्त्व संघर्षमय असतं. ते आयुष्यभर काही ना काही आव्हानांना सामोरं जात असतात. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत जर तळहात खूप कठीण असेल, तर त्यांचं आयुष्य अनेकदा मानसिकदृष्ट्या थोडं अवघड ठरतं. अशा लोकांचा स्वभाव काहीसा हट्टी असतो, जे त्यांच्या नातेसंबंधांवर परिणाम करू शकतो.
लालसर तळहात
एखाद्याचा तळहात जर खूप लालसर असेल, तर तो माणूस भावनांनी भरलेला, थोडा चिडचिडा आणि क्वचित विस्फोटक स्वभावाचा असू शकतो. अशा व्यक्ती खर्च करताना विचार करत नाही आणि छोट्या छोट्या गोष्टींवरही मोठा राग व्यक्त करतात. काही वेळा त्यांचं हे असंतुलन त्यांना चुकीच्या सवयींच्या वाटेवरही घेऊन जाऊ शकतं.
मऊ, नाजूक तळहात
मात्र मऊ, नाजूक तळहात असलेले लोक हे अगदी वेगळ्या स्वभावाचे असतात. त्यांची वृत्ती नम्र, प्रेमळ आणि संयमित असते.
अशा व्यक्ती कामात प्रामाणिक असतात, कठोर मेहनती असतात आणि त्यांच्या मधुर स्वभावामुळे लोकांमध्ये लवकरच प्रिय होतात. त्यांचा आत्मविश्वास त्यांना आयुष्यात अनेक क्षेत्रांत यश मिळवून देतो.