पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!

Published on -

घरात पैसा येतो, उत्पन्न चांगलंही असतं, पण तरीही हातात काहीच राहत नाही अशी अवस्था अनेक जण अनुभवत असतात. त्यामागचं कारण फक्त खर्च वाढला आहे असं नाही, तर कधी कधी घरातील ऊर्जा किंवा वास्तु दोष हेही एक महत्त्वाचं कारण ठरू शकतं. आपल्या घराची रचना, वस्तूंची मांडणी, दिशा यांचा आपल्या आर्थिक स्थैर्यावर आणि लक्ष्मीच्या कृपेवर खोल परिणाम होतो. म्हणूनच, काही सोपे वास्तु उपाय लक्षात घेतले, तर घरात समृद्धीचा झरा वाह शकतो.

उत्तर दिशा

 

वास्तुशास्त्र सांगतं की उत्तर दिशा ही श्रीमंतीचं प्रतीक आहे. याच दिशेचा संबंध कुबेर आणि लक्ष्मी यांच्याशी आहे. त्यामुळे घरातील रोख रक्कम, बचत किंवा दागिन्यांची तिजोरी ही उत्तर दिशेकडे तोंड असलेली आणि दक्षिण दिशेला टेकलेली असावी. अशा प्रकारे तिजोरी ठेवली, तर आर्थिक साठवण आणि समृद्धीला चालना मिळते.

प्रवेशद्वारावर दिवा लावा

 

संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणं हे केवळ धार्मिक कारणांसाठी नसून, ते एक सकारात्मक ऊर्जा जागवण्याचं साधनही आहे. वास्तुशास्त्र सांगतं की संध्याकाळी देवी लक्ष्मी भ्रमंती करत असते आणि तिला आकर्षित करण्यासाठी दररोज तुपाचा दिवा प्रवेशद्वारावर ठेवावा. तो दिवा लक्ष्मीला घरात यायला निमंत्रण देतो असं मानलं जातं.

मत्स्यालय

 

जर घरात मत्स्यालय किंवा छोटा कारंजा ठेवायचा असेल, तर ते नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावं. हा कोपरा सर्वात शुभ मानला जातो आणि येथे पाणी असणं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. इथे एक छोटं फिश टँक, कारंजा किंवा पाण्याचा झरा ठेवल्यास घरात धनसंपत्तीची आवक वाढते, असं मानलं जातं.

स्वस्तिक चिन्ह

 

स्वस्तिक चिन्ह हे शुभतेचं आणि सौख्याचं प्रतीक आहे. घराच्या मुख्य दरवाजावर हे चिन्ह दररोज किंवा दर शुक्रवारी काढल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सौख्य, समाधान आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहतं. या छोट्याशा कृतीतही खूप मोठं शक्तिशाली संकेत दडलेलं असतं.

तुटलेल्या वस्तु

 

अनेक वेळा लोक घरात तुटलेल्या वस्तू, जुने खेळणे, बंद घड्याळं किंवा तुटलेले आरसे तिजोरीजवळ ठेवतात. परंतु हे वास्तुनुसार अशुभ मानलं जातं. लक्ष्मी स्वच्छतेच्या ठिकाणीच निवास करते, त्यामुळे तिजोरी आणि तिच्याभोवतीचा परिसर नेहमी स्वच्छ, सुटसुटीत आणि नीटनेटकाच असावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!