अहिल्यानगर :मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी शहरातून एक दिवसांकरिता सुमारे ४४० समाज कंटकांना हद्दपार केले जाणार आहे. त्यात तोफखाना, कोवताली व भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समाजकंटकाचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी केली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेण्याच्या दृष्टीने उपाय योजना केल्या आहेत.
अहिल्यानगर शहरातील मोहरम ला राज्यात अनन्य साधारण महत्त्व आहे. अहिल्यानगर येथील मोहरमसाठी राज्यातून मुस्लिम बांधव येतात. दोन दिवस चालणाऱ्या मोहरम उत्सावामध्ये कोणाताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सजग भूमिका घेतली आहे. मोहरम मिरवणूक मार्गाची पाहणी केली.

शहरातील सर्व यंग पार्त्यांशी चर्चा करून मिरवणूक शांततेत काढण्याचे आवाहन केले आहे. मोहरमसाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त राहणार आहे. त्याच बरोबर जागोजागी टेहाळणी मनोरे देखील उभारण्यात येणार आहेत. त्याच मोहरमच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ४४० समाज कंटकांना एक दिवसाकरिता हद्दपार करण्यात येणार आहेत.
मोहरम मध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होतात. ही मिरवणूक दोन दिवस चालते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त नेमावा लागतो. त्या दृष्टीने आम्ही रूटची पाहणी केली आहे. जिथे गरज पडले तिथे मार्ग बदलण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. मंडळांबरोबर बैठका झाल्या असून, त्यांना सूचनाही करण्यात आल्या आहेत.
– सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक