MBA करायचंय?, मग भारतातील टॉप-5 MBA कॉलेज आणि त्यांची फी, प्रवेशप्रक्रिया, पॅकेज सगळं काही इथे जाणून घ्या!

Published on -

तुम्ही एमबीए करायचा विचार करत असाल तर, योग्य कॉलेज निवडणं हे पहिलं पाऊल ठरतं. कारण एमबीए म्हणजे केवळ पदवी नव्हे, तर संधींचा नवा दरवाजा. दर्जेदार शिक्षण, अनुभवी शिक्षक, आणि उत्तम प्लेसमेंट्स हे सर्व मिळालं तरच हे शिक्षण खरंच फळ देईल. भारतात अशा अनेक संस्था आहेत ज्या या सगळ्या गोष्टींची खात्री देतात. चला तर मग, जाणून घेऊ भारतातील काही अव्वल एमबीए कॉलेजेसबद्दल, त्यांच्या फीपासून ते प्लेसमेंटपर्यंत सगळं काही.

IIMs

सर्वात आधी नाव घेतलं जातं ते IIMs, म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. या सरकारी संस्थांचा देशात अत्युच्च दर्जा आहे. विशेषतः IIM अहमदाबाद, बंगळुरू आणि कलकत्ता या तीन संस्था MBA क्षेत्रात सर्वोच्च मानल्या जातात. येथे प्रवेश मिळवण्यासाठी CAT ही राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत स्पर्धात्मक परीक्षा द्यावी लागते. त्यानंतर ग्रुप डिस्कशन, पर्सनल इंटरव्ह्यू आणि अकॅडमिक बॅकग्राउंडचा विचार होतो. सामान्य प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पदवीत किमान 50% गुण आवश्यक असतात, तर SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी ही अट 45% आहे. या कॉलेजेसची एकूण फी साधारणतः 24 ते 25 लाख रुपये दरम्यान आहे, ज्यामध्ये शिक्षण, वसतिगृह, आणि अन्य शैक्षणिक सुविधा यांचा समावेश होतो. मात्र इतकी गुंतवणूक करणे योग्य वाटतं कारण येथे सरासरी प्लेसमेंट पॅकेज 25 लाखांपेक्षा जास्त असतं.

FMS Delhi

यानंतर FMS Delhi हे एक अत्यंत परवडणारं आणि गुणवत्तेचं सरकारी कॉलेज आहे. दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत येणारं हे संस्थान कमी खर्चात दर्जेदार एमबीए शिक्षण देतं. येथे शिक्षण घेण्यासाठीदेखील CAT स्कोअर आवश्यक असतो आणि यामध्येदेखील मुलाखत व इतर प्रक्रिया होतात. त्याची संपूर्ण फी फक्त 12.45 लाख रुपये आहे, जी बाकी टॉप संस्थांच्या तुलनेत खूपच कमी आहे. तरीही येथे सरासरी प्लेसमेंट 25 लाखांच्या आसपास आहे, हेच याचं मोठं वैशिष्ट्य.

XLRI Jamshedpur

तिसरं नाव घ्यावं लागेल ते XLRI Jamshedpurचं. खासकरून Human Resource Management (HRM) कोर्ससाठी ही संस्था जगभर प्रसिद्ध आहे. येथे प्रवेशासाठी XAT नावाची स्वतंत्र परीक्षा असते. या कॉलेजची फी सुमारे 15.3 लाख रुपये आहे आणि इथे HRM, General Management, Logistics यांसारख्या शाखांमध्ये शिक्षण दिलं जातं. इथेही प्लेसमेंट जोरदार असते. अनेक मोठ्या मल्टिनॅशनल कंपन्या इथून थेट भरती करतात आणि सरासरी पॅकेज 25 ते 27 लाख रुपये पर्यंत पोहोचतं.

या सर्व संस्थांचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर. इथे केवळ पुस्तकं वाचून पदवी मिळत नाही, तर व्यावसायिक जगतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेले संवाद कौशल्य, समस्या सोडवण्याची पद्धत आणि नेतृत्वगुण हे सर्व शिकवलं जातं.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!