कोणत्याही महिन्यांच्या ‘या’ तारखांना जन्मलेली मुलं असतात मम्माज बॉय ! आईला कधीच एकटं सोडत नाहीत, प्रचंड श्रीमंत होतात

अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. या अंकशास्त्रात व्यक्तीच्या केवळ जन्मतारखेवरून त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमानाची माहिती मिळत असल्याचा दावा केला जातो.

Published on -

Numerology Secrets : भारतीय संस्कृतीत आई-वडिलांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. असं म्हणतात की आई-वडिलांची सेवा केल्यास काशी मथुरा ला जाण्याची गरज भासत नाही. आई वडिलांच्या पायातच स्वर्ग असतो. आपल्या पुराणात आणि ग्रंथात अशी अनेक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतील. भक्त पुंडलिक यांचे उदाहरण देखील त्यापैकीच एक आहे.

भक्त पुंडलिक यांनी आपल्या आई वडिलांची अंतकरणापासून सेवा केली होती आणि यामुळे स्वतः त्रिलोक्याचा स्वामी बा विठोबा पुंडलिकाच्या भेटीसाठी त्याच्याकडे गेला आणि भक्त पुंडलिकाने सरकवलेल्या विटेवर बा विठोबा कटेवर हात ठेवून उभा राहिला जो की आजही तुम्हा आम्हा भक्तांचे रक्षण करतोय.

पण याच भारतीय संस्कृतीत अलीकडे एक वेगळं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक तरुण आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे तरुण वर्ग आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवत आहेत.

पण आजही अशी काही मुलं आहेत जी की आपल्या आई वडिलांना जीवापाड जपतात. दरम्यान आज आपण अशा काही तरुणांची माहिती पाहणार आहोत जे की आपल्या आईचे लाडके असतात आणि ते आपल्या आईला कधीच एकटं सोडत नाहीत. 

 या तारखांना जन्मलेले तरुण असतात मम्माज बॉय

अंकशास्त्र ही वैदिक ज्योतिष शास्त्राची एक महत्त्वाची शाखा आहे. याच अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. अंकशास्त्र असं सांगतो की व्यक्तीच्या केवळ जन्म तारखे वरून त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्य सांगितले जाऊ शकते.

दरम्यान आज आपण अशा काही जन्मतारखांची माहिती पाहणार आहोत ज्या तारखांना जन्मलेली मुलं आपल्या आईला फारच जीव लावतात. कोणत्याही महिन्याच्या 1, 2, 3, 6, 8, 12, 15, 20, 26, 28 आणि 30 तारखेला जन्मलेली मुले त्यांच्या आईला जिवापाड जपतात.

हे तरुण म्हातारपणात देखील आपल्या आईची सेवा करतात. हि मुलं त्यांना कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडत नाहीत. आपल्या आईसाठी या तरुणांची वाटेल ते करण्याची तयारी असते. हे तरुण त्यांच्या आईला खूप प्रेम आणि पाठिंबा देतात.

हे तरुण नेहमीच घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या तारखांना जन्मलेली मुलं त्यांच्या आईसाठी सपोर्ट सिस्टीम असतात असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. ही मुलं आपल्या आईला आनंदी ठेवण्यासाठी वाटेल ते करू शकतात आणि करतात. 

या तारखेला जन्मलेली लोक स्वबळावर यशस्वी होतात

अंकशास्त्रात असेही सांगितले गेले आहे की, कोणत्याही महिन्याच्या 4, 8, 17, 19 आणि 26 या तारखेला जन्मलेली मुलं स्वबळावर यशस्वी होण्याची कुवत ठेवतात. हे लोक इतके मेहनती असतात की ते स्वबळावर यशाला गवसणी घालतात. स्वतःच्या मेहनतीने हे लोक प्रचंड श्रीमंत होतात.

या लोकांना कोणाकडूनच अपेक्षित मदत मिळत नाही पण तरीही हे लोक आपल्या आयुष्यात एक नवीन आणि उच्च स्थान प्राप्त करतात. हे लोक आपल्या ताकतीवर उच्चपदे ग्रहण करतात. या लोकांच्या मागे कोणाचीच सपोर्ट सिस्टम नसते पण तरीही हे लोक एवढे यशस्वी होतात की इतरांना ते सपोर्ट सिस्टम असूनही करता येणे अशक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!