अहिल्यानगर : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात आहेत. आषाढी एकादशीचे वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व आहे, त्यामुळे या दिवशी घरातील लहान थोर मंडळी उपवास करतात. त्यामुळे या उपवासासाठी शाबुदाना, केळी तसेच रताळे, बटाटे आदी पदार्थ मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात.
त्या अनुषंगाने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी रताळ्याची ३३४ क्विंटल आवक झाली होती. या रताळ्याला प्रतिक्विंटल १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत भाजीपाल्याची २१९४ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक बटाट्याची ५६७ क्विंटल आवक झाली होती.

यावेळी बटाट्याला १४०० ते २५०० रुपये भाव मिळाला. त्याचसोबत बाजार समितीत टोमॅटोची ४३७ क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते १८०० रुपये भाव मिळाला. वांग्यांची २१ क्विंटल आवक झाली होती. वांग्यांना प्रतिक्विंटल ३००० ते ८००० रुपये भाव मिळाला. काकडीची १३० क्विंटल आवक झाली होती.
काकडीला प्रतिक्विंटल ५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. गवारीची ११ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ६००० ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ३९ क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला १५०० ते ५५०० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची ११ क्विंटल आवक झाली होती.
घोसाळ्याला प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची २३ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. कारल्याची २२ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल २५०० ते ७५०० रुपये भाव मिळाला. कैरीची २ क्विंटलवर आवक झाली होती. कैरीला १००० ते ३००० रुपये भाव मिळाला. भेंडीची ५६ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल २००० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.