रेल्वे प्रवासात आजारी पडलात? फुकटात मिळेल वैद्यकीय उपचार! रेल्वे तिकीटाचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत होते का?

Published on -

जगभरात सर्वाधिक रेल्वे जाळे असणाऱ्या देशात भारताचे नाव आघाडीवर दिसून येते. दिवसभरात हजारो ट्रेन धावतात, लाखो प्रवासी प्रवास करतात. भारतात रेल्वेचा प्रवासही खूपच स्वस्त आणि सुलभ मानला जातो. आजवर आपण रेल्वे तिकीट फक्त प्रवासासाठीच वापरत आलो आहोत. स्टेशनवर उतरल्यावर किंवा सीटवर बसल्यावर तिकीट दाखवायचं, झालं. मात्र, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? की हे छोटेसे कागदाचे तिकीट, केवळ तुमचं प्रवासाचं साधन नसून, अनेक अनपेक्षित आणि उपयुक्त गोष्टींसाठीसुद्धा उपयोगी पडू शकतं.

मोफत वैद्यकीय मदत

खरं तर, रेल्वे तिकीट म्हणजे केवळ तुमच्या सीटचा हक्क नव्हे, तर एक प्रकारचं संरक्षण कवच आहे. कल्पना करा, तुम्ही ट्रेनने एका लांब प्रवासाला निघाला आहात आणि अचानक वाटेत तुमची तब्येत बिघडली, तर काय कराल? अशा वेळी रेल्वे प्रशासन आपल्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडतं. तिकीट दाखवल्यावर वैद्यकीय मदत तातडीने उपलब्ध करून दिली जाते. आणि ही सेवा अगदी मोफत असते.

विश्रांतीगृह

पुढची बाब म्हणजे वास्तव्याची. समजा, तुम्ही एखाद्या शहरात पोहोचलात आणि एखादी सुरक्षित जागा हवी आहे काही तास विश्रांतीसाठी. तर तुमचं कन्फर्म तिकीट तुम्हाला आयआरसीटीसीच्या विश्रांतीगृहात अगदी नाममात्र दरात, म्हणजे फक्त ₹150 मध्ये, जागा देऊ शकतं. थोडक्यात काय, हॉटेलच्या शोधात वणवण फिरण्याची गरज नाही.

प्रवास विमा

 

अजून एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे प्रवास विमा. बऱ्याच जणांना हे माहितीही नसेल की रेल्वे तिकीट बुक करताना, अवघ्या ₹0.45 मध्ये तुम्हाला ₹10 लाखांपर्यंतचा विमा संरक्षण मिळतो. हा एक प्रकारचा ‘लपलेला फायदा’ आहे, ज्याचा उपयोग गंभीर आपत्तीतही होऊ शकतो.

ब्लँकेट्स आणि चादरी

रेल्वे प्रवासात उशीरा दिले जाणारे ब्लँकेट्स आणि चादरी हा एक जुना त्रास आहे. पण आता जर तुम्ही तुमचं तिकीट दाखवलं, तर कर्मचाऱ्यांकडून चादरी आणि ब्लँकेट मिळवणं तुमचा अधिकार आहे. तुमच्या सोयीसाठी ही सेवा अगदी अधिकृत पद्धतीने दिली जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!