अहिल्यानगर शहरात मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे तगडे नियोजन, तब्बल १००० हजार पोलिसांचा असणार बंदोबस्त

Updated on -

अहिल्यानगर- मोहरम विसर्जन मिरवुणकीसाठी शनिवार (दि. ५) व रविवार (दि. ६) अशी दोन दिवस मोहरम विसर्जन मिरवणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे एक हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तसेच, जागो जागी चौक्या व पहारे राहणार आहेत. मोहरमच्या अनुषंगाने शहरात नो व्हेईल झोन घोषीत करण्यात आला.

अहिल्यानगर शहरातील मोहरमनिमित्त कत्तलची रात्र मिरवणूक व मोहरम विसर्जन मिरवणुकीसाठी शहर पोलिस विभागाने जोरदार तयारी केली आहे. दोन दिवस चालणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी तगडा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. मिरवणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील सुमारे ४४० लोकांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यात कोतवाली १०३, तोफखाना १६२, भिंगार कॅम्प १७४ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, मोहरम बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलिस दल, शिघ्र कृती दलाच्या तुकडया, होमगार्ड असा बंदोबस्त दिला आहे. त्यात दोन अपर पोलिस अधीक्षक, चार उपअधीक्षक, ६५ पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, ८२० पोलिस अंमलदार, शंभर होमगार्डचा समावेश आहे. दरम्यान, कोठला येथून निघणारी मोहरम विसर्जन मिरवणूक सावेडी गावाजवळील बाराइमाम बारव येथे विसर्जित होणार आहे.

नो व्हेईकल झोन

५ व ६ जुलै रात्री मोहरम विसर्जन मिरवणूक राहणार असल्याने मिरवणूक मार्गावर व्हेईकल झोन वाहन विरहीत क्षेत्र घोषीत करण्यात आले. केवळ रुग्णवाहिका, पोलिस, मनपाच्या वाहनांना प्रवेश असणार आहे.

कत्तलकी रात्र मिरवणुकीचा मार्ग

कोठला मैदान, फलटन चौकी, बारा इमाम हवेली, मोठी सवारी, मंगलगेट बाजार, डाळमंडई, तेलीखुंट, कापड बाजार, शहाजी चौक, मोची गल्ली, नवा मराठा प्रेस, जुना कापड बाजार, भिंगारवाला चौक, अर्बन बँक रोड, लक्ष्मीबाई कारंजा, कोर्टची मागील बाजूस सबजेल चौक, मनपा चौक, पंचपीर चावडी, जुना बाजार रोड, धरती चौक, हातमपुरा, डावरे गल्ली, नालबंद खुंट, रामचंद्र खुंट, किंग्स गेट हवेली, कोंड्या मामा चौक, फलटण चौकी.

मोहरम विसर्जन मिरवणुकीचा मार्ग

कोठला, फलटन चौकी, बारा इमाम हवेली, मंगलगेट, आडते बाजार, पिंजार गल्ली पारशाखुंट, जुना कापड बाजार, देवेंद्र हॉटेल, ख्रिस्त गल्ली, बुरुड गल्ली, जुना बाजार, पंचपीर चावडी, मनपा, दो बोटी चिरा मस्जिद कोर्टाच्या मागील बाजूने, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट, नीलक्रांती चौक, बालिकाश्रम रोड, बाराइमाम बारव, सावेडी गाव.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!