लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री आदिती तटकरे यांची मोठी घोषणा, पहा..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Updated on -

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींसाठी महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया मधून एक मोठी गुड न्यूज दिली आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की गेल्या महिन्यात म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता.

दुसरीकडे 30 जून 2025 रोजी लाडक्या बहिणींच्या जून महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून 3600 कोटी रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात हा निधी जमा झालेला नव्हता. यामुळे जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न लाडक्या बहिणीकडून उपस्थित केला जात होता.

दरम्यान आता याच संदर्भात मंत्री आदिती तटकरे यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सविस्तर माहिती दिली आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून देण्यात आली आहे.

काय म्हणाल्यात मंत्री तटकरे?

लाडक्या बहिणी गेल्या काही दिवसांपासून जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित करत होते. दरम्यान काल पासून म्हणजे 4 जुलैपासून या योजनेचा जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्याची सुरुवात झाली आहे.

स्वतः राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर असे सांगितले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.

योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे. महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब,

माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.

 

https://x.com/iAditiTatkare/status/1941157778610860348?t=aOFLlf_I2ZKVbeBg-IOEPw&s=19 

 

कशी आहे लाडकी बहीण योजना? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या वर्षी सुरु झाली. जून 2024 मध्ये या योजनेची घोषणा झाली आणि जुलै महिन्यापासून या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळतोय. या अंतर्गत दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात असून आत्तापर्यंत एकूण 12 हप्त्यांचे पैसे पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 2024 आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून 2025 या काळातील एकूण 12 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यापैकी जून महिन्याचा हप्ता हा कालपासून म्हणजे 4 जुलै 2025 पासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!