श्रीगोंदा- वीस वर्षापूर्वी दाखल गुन्ह्यातील खटल्याचे सुनावणी कामी न्यायालयात हजर राहत नसलेल्या आरोपीला नॉन बेलेबल वॉरंटमध्ये वीस वर्षांनंतर श्रीगोंदा पोलिसांनी वांगदरी गावचे शिवारात सापळा रचुन ताब्यात घेत ठोकल्या बेड्या. शफीक अदम अत्तार रा. लिंपणगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फौजदारी न्यायालय श्रीगोंदा यांचेकडील संक्षिप्त फौजदारी खटला क्रमांक २०००२३४/१९९९ सरकार विरुध्द शफीक अदम अत्तार या नॉनबेलबल वॉरन्ट मधील आरोपी शफीक अदम अत्तार हा २० वर्षापासुन खटल्याचे सुनावणी कामी न्यायालयात हजर राहत नसल्याने त्यांचे विरुद्ध न्यायालयाने नॉनबेलबल वॉरन्ट काढला होता.

त्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी पो.ना ज्ञानेदव भागवत व पो. अंमलदार मनोज साखरे यांना सुचना देवुन आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते. त्यानुसार आरोपीचा शोध घेत असताना पोलिस कर्मचारी मनोज साखरे यांना आरोपी शफीक अदम अत्तार हा वांगदरी गावचे शिवारात येणार असल्याचे खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने त्यास वांगदरी गावचे शिवारात सापळा रचुन ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक किरण शिंदे, पो.ना ज्ञानेदव भागवत, पोकॉ मनोज साखरे यांनी केली आहे.