‘या’ 10 सवयी आत्ताच बदला, अन्यथा तुमचा फ्रीजच बनू शकतो टाइम बॉम्ब! एका झटक्यात घर जळून खाक होईल

Published on -

आजकाल प्रत्येक घरात फ्रीज दिसून येतोच. घरातल्या स्वयंपाकघराचा तो एक अविभाज्य भाग आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंड पाण्याची बाटली असो वा उरलेलं अन्न ताजं ठेवायचं असो, फ्रिजशिवाय आपण कल्पनाही करत नाही. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की हाच फ्रिज एके दिवशी तुमच्या घरासाठी टाईम बॉम्बसारखा ठरू शकतो? योग्य काळजी घेतली नाही, तर हा उपयोगी वाटणारा फ्रिज काही मिनिटांत तुमचं सगळं घर राख बनवू शकतो.

गरजेपेक्षा जास्त सामान ठेऊ नका

सामान्य घरांमध्ये दिवसाचे 24 तास चालणारा फ्रिज कधीही बंद न होणारा एकमेव उपकरण असतो. त्यामुळेच त्याची देखभाल आणि योग्य वापर गरजेचं आहे. पण दुर्दैवाने बरेचदा आपण काही साध्या आणि अज्ञानातून होणाऱ्या चुका करत राहतो, ज्या खूप महागात पडू शकतात.

जसे की, फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान भरल्याने, त्यात हवा फिरत नाही आणि त्यामुळे कंप्रेसरवर अनावश्यक ताण येतो. अशा वेळी ते गरम होतं आणि धोकादायक होण्याची शक्यता वाढते.

त्याचप्रमाणे, घरात जुना झालेला फ्रिज अजून चालतो म्हणून वापरत राहणे ही सुद्धा मोठी चूक ठरू शकते. जुना कॉम्प्रेसर, गळणारी गॅस लाइन, आणि जुनी वायरिंग हे सर्व मिळून कधीही शॉर्ट सर्किट किंवा स्फोट घडवू शकतात. वाईट दर्जाच्या वायर किंवा प्लगचा वापरसुद्धा ठिणग्यांचा धोका वाढवतो, त्यामुळे चांगल्या कंपन्यांचे उपकरणे वापरणं आवश्यक ठरतं.

व्होल्टेजमधील चढउतार

कधी कधी व्होल्टेजमध्ये होणारी सततची चढउतार सुद्धा फ्रिजसाठी घातक ठरते. अशा परिस्थितीत स्टॅबिलायझरचा वापर अनिवार्य होतो, जे फ्रिजला अनपेक्षित वीज प्रवाहापासून वाचवतो. याचबरोबर, रेफ्रिजरंट गॅस गळत असेल, तर तो अतिशय ज्वलनशील असतो. याचा थोडासा स्फोट एखाद्या आगीत बदलू शकतो. त्यामुळे ज्या क्षणी फ्रिजमधून अजब वास येऊ लागतो किंवा धूर, आवाज जाणवतो, तेव्हा वेळ न दवडता तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे.

6 महिन्यांनी सर्व्हिसिंग करा

स्वच्छतेच्या बाबतीत देखील आपण थोडं दुर्लक्ष करत असतो. फ्रिजची मागची बाजू धूळ आणि घाणेनं भरलेली असते, जे थंड हवा खेळण्यास अडथळा ठरते. त्यामुळे दर 6 महिन्यांनी सर्व्हिसिंग करणे, स्वच्छता राखणे आणि फ्रिज योग्य अंतरावर ठेवणे अत्यंत महत्त्वाचं आहे.

काही जण तर फ्रिजचे भाग स्वतःच काढून दुरुस्त करताना दिसतात, पण हेही चुकीचं आहे. यातून शॉक लागण्याची, गॅस गळण्याची किंवा संपूर्ण सिस्टिम बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणताही बदल तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!