Ahilyanagar Breaking : अखेर नदीत बुडालेल्या महिलेचा मृतदेह आढळला

Published on -

Ahilyanagar Breaking : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मोठ्या पुलावरुनएका स्त्रीला गोदावरी पात्रात पडताना अनेक लोकांनी पाहिल्यानंतर आपत्ती विभागातील स्वयंसेवकांनी सदर महिलेस गोदावरी पात्रात शोधण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

सदरची घटना ३० जून रोजी घडली. दरम्यान, चार दिवसानंतर काल शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील वारी शिवारातील गोदापात्रात सदर महिलेचा मृतदेह आढळला.

पोलिसांनी सदर महिलेच्या संदर्भात ओळख पटविण्यासाठी बराच प्रयत्न केल्यानंतर तिचे नाव रेणुका नंदकुमार वढणे (वय ४४, रा. ईशाननगर, जेऊर पाटोदा), असे आढळले. या संदर्भात सदर महिलेचे पती नंदकुमार चंद्रकांत वढणे यांनी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या प्रकरणी सहाय्यक फौजदार वाखुरे पुढील तपास करीत आहे. सदर महिलेच्या मृत्यूबद्दल शहरात अनेक तर्क-वितर्क करण्यात आले. अद्याप मृत्यूचे कारण समजले नाही

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!