अभिनेत्री किमी काटकर हीने 1980 आणि 90 च्या दशकात आपल्या हॉट अंदाजाने संपूर्ण चित्रपटसृष्टीला घायाळ केलं. मात्र, एका चित्रपटातील दोन मिनिटांच्या सीनने तिचं संपूर्ण करिअर बदलून टाकलं. इतकंच काय तर, या सीनमुळे एका विवाहित जोडप्याचं आयुष्यही पूर्णपणे ढवळून निघालं.

1989 मध्ये आलेल्या ‘काला बाजार’ या चित्रपटात अनिल कपूर आणि किमी काटकर यांच्यात एक अत्यंत धाडसी सीन चित्रीत करण्यात आला. या दृश्यात किमी टॉपलेस अवस्थेत अनिल कपूरसमोर दिसते, आणि बाथरूममध्ये घडणाऱ्या त्या दोन मिनिटांच्या दृश्यामुळे चित्रपटगृहात एकच खळबळ उडाली. ही दृश्य फक्त पडद्यापुरती मर्यादित राहिली नाहीत, तर लोकांनी त्यांच्या नात्यावरही चर्चा सुरू केली.
अनिल कपूरचे वैवाहिक आयुष्य
हा सीन केवळ चर्चा-खळबळ पुरता मर्यादित राहिला नाही, तर अनिल कपूरच्या वैवाहिक आयुष्यावरसुद्धा त्याचा थेट परिणाम झाला. त्याची पत्नी सुनीताने कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल की तिच्या नवऱ्याचं नाव अशा पद्धतीने जोडलं जाईल. एका अहवालानुसार, सुनीता हिला या जवळीकतेचा अंदाज लागल्यानंतर ती थेट चित्रपटाच्या सेटवर पोहोचली आणि त्या दोघांना जवळ पाहिल्यानंतर संतापाने थरथर कापू लागली.
या क्षणी सुनीता इतकी व्यथित झाली की तिने अनिल कपूरला स्पष्टपणे सांगितलं “मी हे सहन करणार नाही, आणि मुलांसह घर सोडून जाईन.” तेव्हा अनिल कपूरने आपल्या वैवाहिक नात्याला प्राधान्य दिलं आणि सुनीताला वचन दिलं की, तो किमी काटकरशी कोणताही संबंध ठेवणार नाही. या आश्वासनानंतरच सुनीता पुन्हा घरी परतली.
किमी काटकरची फिल्मी लाईफ
किमी काटकरसाठी ही काही पहिलीच वेळ नव्हती. 1985 मध्ये ‘अॅडव्हेंचर्स ऑफ टारझन’ या चित्रपटात तिने अभिनेता हेमंत बिर्जेसोबत अनेक बोल्ड दृश्यांमध्ये काम करत आपलं धाडस दाखवलं होतं. त्या काळी इतकं उघडं प्रदर्शन हे फार मोठं धाडस मानलं जात होतं. त्यानंतर ‘हम’ चित्रपटात अमिताभ बच्चनसोबत ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यात आयटम डान्स करत तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
कला, सौंदर्य आणि चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेली ही अभिनेत्री अचानकच सिनेसृष्टीपासून दूर गेली. अनेकांनी या मागचं कारण तिचं वैयक्तिक आयुष्य, तर काहींनी इंडस्ट्रीतील बदलती दिशा मानली. पण तिच्या धाडसी निवडी आणि पडद्यावरचं तिचं सशक्त अस्तित्व अजूनही बऱ्याच जणांच्या आठवणीत जिवंत आहे.