बळीराजा सुखी होऊ दे! पांडुरंगाच्या चरणी अक्षय कर्डिले यांची भावनिक प्रार्थना

Published on -

Ahilyanagar News : शेतकरी सुजलाम् सुफलाम् झाला तर देशातील प्रत्येक नागरिक सुखी आणि समाधानी राहील, त्यामुळे राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि बळीराजा सुखी होऊ दे, अशी प्रार्थना भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी पंढरीच्या पांडुरंगाकडे केली आहे.

राहुरी नगर पाथर्डी नेवाशासह जिल्हाभरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या अनेक दिंड्यांचे स्वागत युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले. पिंडी चालक, दिंडीतील वारकन्यांशी संवाद साधत कर्डिले यांच्या हस्ते ठिक ठिकाणी दिंड्यांतील वारकऱ्यांना मोफत चहा-नाश्ता औषधांचे वाटप करण्यात आले.

तरुणांच्या मनामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करणारे अक्षय कर्डिले यांनी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या दिंड्यांमधील ज्येष्ठ वारकऱ्यांचे आशीर्वाद घेत युवा वारकऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयन केला.

हिंदू विचारसरणीचा युवा चेहरा म्हणून तरुण वर्ग अक्षयकर्डिले यांच्याकडे आकर्षित होऊ लागला आहे. भगवीपताका खांद्यावर घेत विटू नामाचा जयघोष करत पंढरपूरकडे निघालेल्या अनेक दिंडयांना अक्षय कर्डिले यांनी भेटी देऊन ज्ञानोचा तुकारामाचा जयघोष केला. पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या सराला बेट ते पंढरपूर या गंगागिरी महाराज पायी दिंडीचे प्रमुख रामगिरी महाराज यांचे स्वागत करण्यात आले. तसेच निवृत्तीनाथ महाराज पालखी पायी दिंडीचेही स्वागत करण्यात आले.

संत कवी महिपती महाराज दिंडी, श्री क्षेत्र बायजामाता दिंडी, श्री त्रिंबकेश्वर, खंडाळा पायी दिंडी, शेंगदाणे बाबा मठ पायी दिंडी, तनपुरे बाबा, गव्हाणे चाया, उंबरेकर महाराज, भगवान बावा अशा अनेक संत माहंताच्या पायी दिंड्यांचे स्वागत युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.

दिंडीतील वारकऱ्यांचा प्रवास सुखाचा व्हावा व राज्यात भरपूर पाऊस होऊन बळीराजा सुखी व्हावा, अशी प्रार्थना पंडरीच्या पांडुरंगाकडे अक्षय कर्डिले यांनी या निमित्ताने केली. याबरोबरच अक्षय कर्डिले हे इतरही विविध सामाजिक उपक्रम राचवत असतात. अडचणीत असलेले तरुण, युवक, ग्रामस्थांच्या मदतीला धावून जात असतात.

राजकारणापलीकडचे वारकरी कुटुंब

आमचे कुटुंब राजकारणी म्हणून जरी ओळखले जात असले तरी आमचे आजोबा तसेच आमचे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले यांना धार्मिक कार्याची नेहमी आवड आहे. त्याचाच एक भाग म्हणून दरवर्षी आ. कर्डिले संत पूजनाचा कार्यक्रम आयोजित करतात, धर्म, संस्कृती आणि संस्कार याला आ. कर्डिले यांनी प्रथम प्राधान्य दिले आहे. त्याची शिकवण आणि मार्गदर्शन माझ्यासाठी महत्त्वाचे असून, संत विचार आणि संतसेवा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. अक्षय कर्डिले – (जिल्हाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा).

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!