Maharashtra Railway News : तुम्हीही तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जाणार आहात का मग तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे.
आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी तसेच दिवाळी सारख्या सणासुदीच्या कालावधीत तिरुपतीला जाणाऱ्यांची संख्या आणखी वाढते. याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून महाराष्ट्रातून चालवल्या जाणाऱ्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अकोला ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला दक्षिण मध्य रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. यामुळे विदर्भातून तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान, आता आपण अकोला ते तिरुपती दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनला किती दिवस मुदत वाढ देण्यात आली आहे आणि या गाडीचे वेळापत्रक कसे असणार याची माहिती जाणून घेणार आहोत.
अकोला – तिरुपती विशेष एक्सप्रेस ट्रेन ला किती दिवसांची मुदत वाढ ?
अकोला – तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी ( ट्रेन क्रमांक 07606 ) 29 जून 2025 पर्यंत चालवली जाणार होती. मात्र आता या गाडीला सहा जुलै 2025 ते 29 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याची माहिती समोर आली आहे.
तसेच गाडी क्रमांक 07605 म्हणजेच तिरुपती अकोला साप्ताहिक विशेष गाडी 27 जून 2025 पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता या गाडीला 4 जुलै 2025 ते 27 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यामुळे अकोल्याहून तिरुपती बालाजीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अकोल्यासहित संपूर्ण विदर्भातील भाविकांसाठी ही एक दिलासादायक बातमी राहणार आहे.
कसे राहणार वेळापत्रक?
या साप्ताहिक विशेष गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर अकोला तिरुपती साप्ताहिक विशेष गाडी (ट्रेन क्रमांक 07606) सहा जुलै 2025 ते 29 मार्च 2026 या कालावधीत दर रविवारी सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी अकोला रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
तसेच, गाडी क्रमांक 07605 ही तिरुपती – अकोला साप्ताहिक विशेष गाडी चार जुलै 2025 ते 27 मार्च 2026 या कालावधीत दर शनिवारी तिरुपती रेल्वे स्थानकावरून दुपारी साडेबारा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सव्वा वाजता ही गाडी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.