अहमदनगरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल ; ‘इतके’ रुग्ण बरे, नव्या जिल्ह्याधिकाऱ्यांचे ‘हे’ आदेश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यामध्ये मागील महिन्याच्या तुलनेत सध्या कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून हा आकडा चारशेच्या आत आला आहे.

रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यात नव्याने 182 कोरोना रुग्ण आढळले आहेत.

आजअखेर बाधितांची संख्या 53 हजार 846 इतकी झाली असून उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 1 हजार 375 आहे. तर आतापर्यंत 56 हजार 82 करोनाची बाधा झाली असून यात 861 जणांचा बळी गेलेला आहे. जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्या पैकी 96 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण ठणठणीत झाले आहेत.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिका यांनी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश जिल्हाधिकारी Dr. Rajendra Bhosale यांनी दिले आहेत. नव्याने आढळलेल्या 182 कोरोना रुग्णांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये 21, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या

तपासणीत 57 आणि अँटीजेन चाचणीत 104 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 12, अकोले 2, नगर ग्रामीण 1, नेवासा 1, पारनेर 1, पाथर्डी 2, राहुरी 1, इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 22, अकोले 05, जामखेड 2, कर्जत 1, कोपरगाव 5, नगर ग्रामीण 1, पारनेर 1,पाथर्डी 1, राहाता 5, राहुरी 1, संगमनेर 8, श्रीगोंदा 2, श्रीरामपूर 9 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत काल 104 जण बाधित आढळुन आले.

यामध्ये मनपा 12, अकोले 13, जामखेड 9, कर्जत 9, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 3, नेवासा 5, पारनेर 2, पाथर्डी 18, राहाता 3, संगमनेर 2, शेवगाव 18, श्रीगोंदा 4 आणि श्रीरामपूर 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment