तुम्हालाही लाडकी बहीण योजनेतून काढून टाकलंय का ? कशी पाहणार यादी ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आजची बातमी विशेष महत्त्वाची राहणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही? हे कसे तपासायचे याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत.

Published on -

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी लाडकी बहिण योजना सुरू केली. ही योजना मध्यप्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू झाली आहे. या अंतर्गत दरमहा पात्र ठरणाऱ्या महिलांना पंधराशे रुपयांचा लाभ दिला जात आहे. म्हणजेच लाडकी बहिण योजनेसाठी पात्र महिलांना दरवर्षी 18 हजार रुपयांचा लाभ मिळतोय. खरंतर या योजनेची घोषणा जून 2024 मध्ये करण्यात आली आणि याचा लाभ जुलै 2024 पासून मिळतोय.

या अंतर्गत आत्तापर्यंत एकूण 12 हप्ते देण्यात आले आहेत. जुलै 2024 ते जून 2025 या कालावधी मधील एकूण 12 हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यातील बारावा हप्ता नुकत्याच काही दिवसांपूर्वी जमा करण्यात आला आहे. बाराव्या हप्त्यासाठी 30 जून 2025 रोजी 3,600 कोटी रुपयांच्या निधी वितरणास सरकारकडून मान्यता मिळाली आणि त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाराव्या हप्त्याचे पैसे प्रत्यक्षात महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली.

खरेतर, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ला आता एक वर्ष पूर्ण होत आला आहे. मात्र जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली असतानाही काही महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही, अशी तक्रार आता समोर आली आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे की, सरकारकडून सध्या अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे.

ही योजना गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सुरू झाली आणि यामुळे सुरुवातीच्या टप्प्यात या योजनेचा सर्वच महिलांना लाभ मिळाला. काही अपात्र महिलांनी चुकीचे कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ उचलला आहे. दरम्यान, आता सरकारकडून अशाच अपात्र महिलांना या योजनेतून वगळले जात आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारी कर्मचारी असतानाही या योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर जून महिन्याचा हप्ता मिळालेला नसेल तर त्यांनी सर्वप्रथम आपले नाव योजनेत आहे की नाही? याची खात्री करायला हवी. दरम्यान आज आपण लाडकी बहिण योजनेच्याच्या यादीत नाव आहे की नाही हे महिलांना कसं चेक करता येणार याची माहिती जाणून घेणार आहोत. 

लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाव आहे की नाही कस चेक करणार?

लाडकी बहिण योजनेच्या यादीत तुमचे नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम याच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट दिल्यानंतर तुम्हाला अंतिम यादी विभागात जाऊन आपला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि त्या ठिकाणी दिलेला कॅप्चा कोड टाकून मग तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेल्या ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

अधिकृत वेबसाईटवर ओटीपी टाकून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासता येणार आहे. जर या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला जून महिन्याचाही हप्ता मिळणार आहे आणि यापुढील हप्ते देखील मिळत राहणार आहेत. 

जुलैचा हप्ता कधी मिळणार?

जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जुलै च्या पहिल्या आठवड्यात मिळाला आहे यामुळे जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये मिळणार की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान मीडिया रिपोर्ट मध्ये जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्यातच जमा होईल असे म्हटले जात आहे.

या महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ प्रत्यक्षात लाडक्या बहिणींना मिळू शकतो. तथापि या संदर्भात अधिकृत माहिती समोर आलेले नाही. यामुळे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात मिळणार की पुढील महिन्यात मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!