‘हे’ आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती ! दररोज 2700000000 रुपये दान करतात

भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती कोण आहेत? नाही माहिती. चला तर मग जाणून घेऊयात देशातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक दानशूर व्यक्ती याची सखोल माहिती.

Published on -

India’s Richest Muslim : ‘फोर्ब्स’ ने नुकतीच जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार पुन्हा एकदा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. महत्त्वाची बाब अशी की अंबानी हे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.

त्यांची एकूण संपत्ती ही जवळपास 116 अब्ज डॉलर इतकी आहे. मात्र जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादीत मुकेश अंबानी हे 15 व्या स्थानी विराजमान आहेत. कधीकाळी मुकेश अंबानी जगातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांच्या यादीत होते.

दरम्यान या यादीत गौतम अदानी हे दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. या यादीत उद्योगपती शिव नादर हे तिसऱ्या स्थानी आहेत आणि उद्योगपती सावित्री जिंदाल या यादीत चौथ्या स्थानावर आहेत.

पण आज आपण अशा एका उद्योगपतीची माहिती जाणून घेणार आहोत जे की भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 10 लोकांमध्ये येत नाहीत मात्र त्यांची मनाची श्रीमंती फार मोठी आहे. कारण ते दररोज 2700000000 रुपयांचे दान करतात. शिवाय ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती आहेत. 

हे आहेत भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती 

आम्ही ज्या अवलिया व्यक्ती बाबत बोलत आहोत ते आहेत अझीम प्रेमजी. ते भारतातील सर्वाधिक श्रीमंत मुस्लिम उद्योगपती आहेत आणि दररोज 27 कोटी रुपयांचे दान करतात. यामुळे ते भारतातील सर्वाधिक दानशूर उद्योगपती म्हणूनही ओळखले जातात.

देशातील अग्रगण्य आयटी कंपनी विप्रो लिमिटेड या कंपनीचे ते संस्थापक आहेत. अझीम प्रेमजी हे कोविड काळामध्ये जगातील सर्वाधिक दान करणाऱ्या लोकांमध्ये दुसऱ्या स्थानी होते. त्यावेळी त्यांनी आपला स्वार्थ न पाहता तब्बल 22 अब्ज डॉलर्सची संपत्ती लोकांसाठी दान केली होती.

म्हणूनच कोरोना काळात प्रेमजी यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा झाली. प्रेमजी कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून व्यवसायात आहे. अझीम प्रेमजी यांचे वडील मोहम्मद प्रेमजी म्यानमार मध्ये तेलचा व्यवसाय करत मात्र 1940 च्या सुमारास ते भारतात आले.

नंतर मग 1945 मध्ये अझीम यांचा जन्म झाला. अझीम यांचे मोठे बंधू 1965 मध्ये पाकिस्तानात गेलेत पण त्यांनी भारतात राहूनच व्यवसाय मोठा करायचा असं निश्चित केल होत.

दरम्यान वडिलांचे निधन झाल्यानंतर अझीम यांनी त्यांचा तेलाचा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळला आणि पुढे त्यांनी आयटी क्षेत्रात देखील पदार्पण केले. आपल्या कंपनीचे नाव विप्रो असे केले. दरम्यान याच विप्रो लिमिटेड कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल 3 ट्रिलियन इतके आहे. 

अझीम प्रेमजी यांची एकूण संपत्ती किती ? 

अझीम प्रेमजी यांनी 2021 मध्ये 9713 कोटी रुपयांचे दान केले होते म्हणजेच दररोज 27 कोटी रुपयांचे दान केले होते. हुरुन इंडिया फिलँथ्रॉपीच्या अहवालातून ही माहिती समोर आली होती. दुसरीकडे ‘फोर्ब्स’ने त्यांची एकूण संपत्ती 12.2 अब्ज डॉलर असल्याचे सांगितले आहे. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये त्यांची एकूण संपत्ती एक लाख कोटी रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!