DMart : तुम्हीही डी मार्ट मध्ये जाऊन शॉपिंग करता का? मग तुम्हाला भारतातील सर्वाधिक मोठ्या रिटेल चेनची म्हणजेच डीमार्टबाबत अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल. मग आज आपण याच डी मार्ट संदर्भातील एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. खरे तर डी मार्ट मध्ये ग्राहकांना एमआरपी पेक्षा कमी किमतीत वस्तू उपलब्ध होतात.
डी मार्ट मध्ये तुम्हाला किराणा पासून तर इतर सर्व प्रकारच्या गरजेच्या वस्तू मिळून जातात. यावर ग्राहकांना चांगली सूट देखील दिली जाते. डी मार्ट मध्ये जवळपास दररोज ऑफर सुरू असते.

हेच कारण आहे की डी मार्ट मध्ये शॉपिंग करणाऱ्यांची संख्या भारतात फारच अधिक आहे. आज डी मार्ट शॉपिंग चेन बिजनेस भारतात यशस्वीरित्या सुरू आहे याचे कारण म्हणजे या बिझनेसचे व्यवस्थापन आणि त्याहून सर्वात मोठे कारण म्हणजे कर्मचाऱ्यांचे योगदान.
पण तुम्हाला डी मार्ट मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त कोणकोणते लाभ मिळतात याची माहिती आहे का ? नाही ना, मग आज आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
डीमार्ट मधील कर्मचाऱ्यांना पगाराव्यतिरिक्त मिळतात हे लाभ
इंटरनल प्रमोशन्स : डी मार्ट मधील कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रमोशनची भेट दिली जाते. यासाठी या संबंधित कर्मचाऱ्यांना वेळोवेळी ट्रेनिंग सुद्धा दिली जाते, ट्रेनिंग देऊन त्यांना पुढील पदासाठी सज्ज करण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे.
शॉपिंग मध्ये मिळतो डिस्काउंट : डी मार्ट मधील कर्मचाऱ्यांना शॉपिंग वर सुद्धा मोठा डिस्काउंट दिला जात असतो. यामुळे साहजिकच त्यांचा महिन्याचा खर्च कमी होतो.
परफॉर्मन्स बेस्ड बोनस : डी मार्ट मधील कर्मचाऱ्यांनी जर चांगली कामगिरी केली तर त्यांना बोनस चा सुद्धा लाभ दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या कामगिरी नुसार यांना दरवर्षी बोनस मिळतो आणि यामुळे डी मार्ट मधील कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा मिळतो.
वैद्यकीय विम्याचा लाभ : डी मार्ट मधील काही पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना वैद्यकीय विम्याचा लाभ सुद्धा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
ग्रॅच्यूटीचा लाभही मिळतो : डी मार्ट मध्ये पाच वर्षांपेक्षा जास्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूटीचा लाभ दिला जात असतो. ग्रॅच्युईटी ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात दिली जाणारी बक्षीस रक्कम असते.
PF मिळतो : डी मार्ट मधल्या कर्मचाऱ्यांना पीएफ सुद्धा मिळतो. दरमहा डीमार्ट मधील कर्मचाऱ्यांची एक ठराविक रक्कम ईपीएफ अकाउंट मध्ये जमा केले जाते आणि जेवढी रक्कम कर्मचाऱ्यांकडून जमा केली जाते तेवढीच रक्कम डीमार्ट कडूनही दिली जाते आणि अशा तऱ्हेने निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक मोठी रक्कम पीएफ म्हणून मिळते.