जामखेड तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड सागर मोहोळकरची पोलिस बंदोबस्तात नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

Updated on -

जामखेड- येथील सागर मोहळकर या आरोपीबाबत जामखेड पोलिसांनी सतर्क होत जामखेड कारागृहात न ठेवता न्यायालयाचे परवानगीने पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे.सदर आरोपी सागर दत्तात्रय मोहोळकर जामखेडचा रहिवाशी असून, तो त्याच्या साथीदारांच्या मदतीने लोकांमध्ये दहशत निर्माण करुन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे करत असतो.

यापूर्वी जेलमध्ये अटकेत असताना त्याने एका आरोपीचा खून केला आहे. त्याच्यावर जामखेडसह इतर ठिकाणी मारण्याचा हत्याराने जीवे प्रयत्न, दहशत निर्माण करणे व खून अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र, मोहळकर हा फरार राहून त्याचे अस्तित्व लपवत होता. जामखेड तालुक्यात व परिसरात त्याची मोठी दहशत निर्माण झाली होती.

जामखेड पोलीस स्टेशनला हजर झालेले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व प्रभारी अधिकारी जामखेड पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर यांना सदरचा आरोपी सागर मोहळकर हा सेव्हन फिटनेस जिम जामखेड येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

पोनि. नंदकुमार सोनवलकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोहेकॉ. प्रविण इंगळे, पो.ना. बाघ, पो.ना. सरोदे, पोकॉ. घोळवे, पोकॉ. पळसे, पोकॉ. माने, पोकॉ. दळवी, पोकॉ. बोराटे, पोकॉ. बेलेकर, पोकॉ. कोठुळे, यांच्या पथकाने आरोपी मोहळकर यास मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले.

न्यायालयाच्यो परवानगीने पोलीस बंदोबस्तात त्याची मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवानगी केली आहे. ही कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक व गणेश उगले उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!