महाराष्ट्रातील शाळा 8 आणि 9 जुलैला खरंच बंद राहणार का ? शिक्षण विभागाचा नवीन शासन आदेश जारी ! शिक्षण विभागाने काय सांगितले ?

महाराष्ट्र राज्यातील शाळा आठ आणि नऊ जुलैला खरंच बंद राहणार का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. दरम्यान आता याच प्रश्नाचे उत्तर राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. शिक्षण विभागाने याबाबत नवीन आदेश जारी केला आहे.

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये आणि प्रसार माध्यमांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी म्हणजेच उद्या आणि परवा राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार अशा बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. पण खरंच उद्या आणि परवा राज्यातील शाळा बंद राहणार का ? दरम्यान, आता याच संदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून मोठी माहिती देण्यात आली आहे.

शाळा बंद राहणार का?

आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा मंजूर करावा या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

सध्या महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. राजधानी मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू असून याच पावसाळी अधिवेशनात सरकारला घेण्यासाठी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून हे दोन दिवस शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे मंगळवारी आणि बुधवारी राज्यातील शाळांना सुट्टी राहणार का? असा प्रश्न शालेय विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून उपस्थित होतोय.

दरम्यान आता याच बाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडून एक शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. उद्या आणि परवा राज्यातील विनाअनुदानित आणि अंशता अनुदानित शाळेतील शिक्षकांनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.

मात्र राज्यातील शिक्षण विभागाकडून आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी राज्यातील शाळा सुरूच राहणार असल्याचे आपल्या नव्या शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांच्या माध्यमातून हा शासन आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी तसेच त्यांच्या पालकांनी आठ आणि नऊ जुलै 2025 रोजी शाळा सुरू राहतील याची नोंद घ्यावी असे यावेळी शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. 

आझाद मैदानावर शिक्षकाने कर्मचाऱ्यांचे आंदोलन 

राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षकांची नाराजी आता शिगेला पोहोचली आहे. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे राज्यभरातील हजारो शिक्षक 8 जुलै आणि 9 जुलै 2025 रोजी मुंबईच्या आझाद मैदानात एकत्र येत आंदोलन करणार आहेत.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलन करण्याचा निर्णय शिक्षकांकडून घेण्यात आला आहे. खरेतर, मागील वर्षी 75 दिवस आंदोलन करूनही 14 ऑक्टोबर 2024 च्या जीआरमध्ये अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही.

10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत आश्वासन देऊनही सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नसल्याने आणि गेल्या वर्षभरात या संदर्भातील सकारात्मक निर्णय न झाल्याने शिक्षक संघटना आता पुन्हा एकदा संपाच्या तयारीत आहेत. पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्याचा त्यांचा निर्धार असून आठ आणि नऊ जुलै रोजी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुंबई येथील आझाद मैदानात एकत्र येणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!