Post Office Scheme : आरबीआयने गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेट मध्ये मोठी कपात केली आहे. आरबीआयकडून रेपो रेट एक टक्क्यांनी कमी करण्यात आले आहेत. दरम्यान, आरबीआयच्या निर्णयानंतर देशभरातील बँकांकडून एफडी व्याजदरात कपात करण्यात आली. एसबीआय, बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी यांसह अनेक प्रमुख बँकांनी एफडीचे व्याजदर कमी केले आहेत.
यामुळे मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसतोय. पण जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्टाचा पर्याय बेस्ट राहणार आहे कारण की पोस्टाने अजूनही आपल्या बचत योजनांचे व्याजदर कमी केलेले नाहीत.

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती पाहणार जी की गुंतवणूकदारांसाठी एक मोठी गेम चेंजर योजना ठरणार आहे. या योजनेत अवघ्या काही महिन्यांच्या काळात गुंतवणूकदारांचे पैसे डबल होणार आहेत.
ही योजना ठरणार फायदेशीर
पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र ही योजना गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पोस्ट ऑफिस केव्हीपी म्हणजेच किसान विकास पत्र योजनेला सर्वात लोकप्रिय बनवणारी गोष्ट म्हणजे योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदाराला पूर्ण म्हणजेच मुद्दल आणि व्याजाचे पैसे परत मिळतात.
याशिवाय, या योजनेत केलेले गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेअंतर्गत, गुंतवणूकदार किमान 1000 रुपयांचे खाते उघडून गुंतवणूक सुरू करू शकतात, तर जास्त गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही तुम्हाला हवे तेवढे पैसे या योजनेत गुंतवू शकतात. या योजनेचा कालावधी 115 महिन्यांचा आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पोस्टाकडून 7.5% दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना सिंगल आणि जॉईंट अकाउंट ओपन करता येते. महत्त्वाची बाब अशी की किसान विकास पत्र योजनेत एक व्यक्ती कितीही अकाउंट ओपन करू शकतो. दहा वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या मुलांच्या नावाने देखील या योजनेत अकाउंट ओपन करता येते.
5 लाखाचे 10 लाख आणि 10 लाखाचे 20 लाख होणार
या सरकारी योजनेत गुंतवणूक रकमेवरील व्याज चक्रवाढीच्या आधारावर मोजले जाते. यामुळे या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे लवकर दुप्पट होतात. 115 महिन्यांमध्ये या योजनेत गुंतवलेली रक्कम दुप्पट होते. जर आपण 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीच्या उदाहरणाने समजून घेतले तर, ही रक्कम गुंतवल्यावर 7.5 टक्के व्याजदरानुसार पहिल्या वर्षाच्या शेवटी गुंतवणूकदाराला 7500 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
तसेच ही व्याजाची रक्कम पुढील वर्षाच्या मूळ रकमेत जोडली जाईल आणि रक्कम एक लाख 7500 होईल. आता या जमा रकमेवर दुसऱ्या वर्षी गुंतवणूकदाराला 8 हजार 62 रुपयांचे व्याज मिळणार आहे. आता पुन्हा ही व्याजाची रक्कम मूळ रकमेत जोडली जाईल.
म्हणजेच गुंतवणुकीची एकूण रक्कम एक लाख 15 हजार 562 रुपये इतकी होईल. दरम्यान याच पद्धतीने जोपर्यंत योजनेचा कालावधी पूर्ण होत नाही तोपर्यंत गुंतवणूकदारांची रक्कम वाढत राहणार आहे.
म्हणजेच या योजनेत जर एका लाखाची गुंतवणूक केली तर 115 महिन्यांनी गुंतवणूकदारांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. तसेच पाच लाखांची गुंतवणूक केली तर दहा लाख रुपये आणि दहा लाखांची गुंतवणूक केली तर 115 महिन्यांनी वीस लाख रुपये मिळणार आहेत.