अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वांग्याला मिळाला ७००० रूपयांचा भाव, जाणून घ्या इतर भाजीपाल्याचे काय आहेत दर?

Published on -

अहिल्यानगर- नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी विविध भाजीपाल्याची १९३७ क्विंटल आवक झाली होती. यामध्ये सर्वाधिक ४४० क्विंटल बटाट्याची आवक झाली होती. यावेळी बटाट्याला १२०० ते २४०० रुपये भाव मिळाला.

यावेळी टोमॅटोची ३९० क्विंटल आवक झाली होती. यावेळी टोमॅटोला प्रतिक्विंटल ४०० ते १८०० रुपये भाव मिळाला. वांग्याची १८ क्विंटल आवक झाली होती. यावेळी वांग्यांना २००० ते ७००० रुपये भाव मिळाला. बाजार समितीत पालेभाजांच्या २७७७० जुड्यांची आवक झाली होती.

अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी काकडीची १२५ क्विंटल आवक झाली होती. काकडीला प्रतिक्विंटल ४०० ते २४०० रुपये भाव मिळाला. गवारीची ६ क्विंटल आवक झाली होती. गवारीला ५००० ते ११ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. फ्लॉवरची ३० क्विंटल आवक झाली होती. फ्लॉवरला १००० ते ५२०० रुपये भाव मिळाला. घोसाळ्याची ५ क्विंटल आवक झाली होती.

घोसाळ्याला प्रतिक्विंटल २००० ते ७००० रुपये भाव मिळाला. दोडक्याची १८ क्विंटल आवक झाली होती. दोडक्याला २००० ते ८००० रुपये भाव मिळाला. कारल्याची १५ क्विंटलवर आवक झाली होती. कारल्याला प्रतिक्विंटल २००० ते ५८०० रुपये भाव मिळाला. कैरीची २ क्विंटलवर आवक झाली होती.

कैरीला १००० ते २५०० रुपये भाव मिळाला. भेंडीची ४५ क्विंटलवर आवक झाली होती. भेंडीला प्रतिक्विंटल १५०० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. रताळ्याची ३६० क्विंटल आवक झाली होती. रताळ्याला प्रतिक्विंटल १००० ते ११०० रुपये भाव मिळाला.

कोबीची ७५ क्विंटल आवक झाली होती. कोबीला प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये भाव मिळाला. वालाची १ क्विंटल आवक झाली होती. वालाला ८००० ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. घेवड्याची दोन क्विंटलवर आवक झाली होती. घेवड्याला प्रतिक्विंटल ७ हजार ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!