महाराष्ट्राला मिळणार 28 हजार 429 कोटी रुपयांचा नवा महामार्ग ! राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर; पुणे अन अहिल्यानगरच्या ‘ह्या’ तालुक्यांमधून जाणार

राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील नागरिकांना एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. हा महामार्ग 28 हजार 429 कोटी रुपयांचा खर्च करून विकसित केला जाणार असून आज आपण याचीच डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

Published on -

Maharashtra New Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील रस्त्यांचे नेटवर्क मजबूत करण्यात आले आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याला समृद्धी महामार्गाची भेट मिळाली आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले आहे. यामुळे 701 किलोमीटर लांबीचा संपूर्ण समृद्धी महामार्ग सर्वसामान्यांच्या सेवेत आला असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान झाला आहे. तर दुसरीकडे राज्यातील आणखी एका महत्त्वाच्या महामार्ग प्रकल्पासाठीच्या हालचाली वाढल्या आहेत.

मुंबई, पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाचे शहर असून यातील पुणे आणि नाशिक या दोन शहरा दरम्यान हा नवा औद्योगिक महामार्ग तयार केला जाणार आहे. एकीकडे पुणे – नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे काम काही अडचणींमुळे रखडले आहे तर दुसरीकडे आता पुणे ते नाशिक दरम्यानच्या औद्योगिक महामार्गाला गती देण्यात येत आहे.

पुणे – नाशिक औद्योगिक महामार्गाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे वर्ग

पुणे ते नाशिक व्हाया अहिल्यानगर असा नवीन औद्योगिक महामार्ग विकसित करण्याचा निर्णय राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला असून आता याच प्रकल्पासंदर्भात एक नवीन माहिती हाती आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार या महामार्ग प्रकल्पाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रस्ताव सरकार दरबारी वर्ग झाला आहे. खरे तर या महामार्ग प्रकल्पाच्या संदर्भात फेब्रुवारी 2024 मध्ये एक मोठा निर्णय झाला होता, त्यावेळी या महामार्ग प्रकल्पाच्या अंतिम आखणीला मंजुरी देण्यात आली होती. दुसरीकडे या महामार्गाचा डीपीआर आणि फिजिबिलिटी रिपोर्ट सुद्धा रेडी झालेला आहे. दरम्यान आता या संदर्भातील सविस्तर प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. सदरील महामार्ग प्रकल्प 28 हजार 429 कोटी रुपये खर्चाचा असून या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून मंजुरी मिळाल्यानंतर याची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे. दरम्यान आता आपण या महामार्ग प्रकल्पाचा रूट कसा असेल, हा मार्ग कोणत्या भागातून जाणार याबाबतची माहिती पाहणार आहोत.

कसा असणार नव्या मार्गाचा रूट?

या महामार्गाची एकूण लांबी 133 किलोमीटर इतकी राहणार आहे. यासाठी जवळपास 1550 हेक्टर जमिनीचे संपादन अपेक्षित आहे. हा पुणे – नाशिक औद्योगिक महामार्ग अहिल्यानगर मार्गे प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग पहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधून जाईल आणि पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांमधून हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या महामार्ग प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. सदरील औद्योगिक महामार्गामुळे पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल अशी आशा आहे. महत्त्वाची बाब अशी की काम सुरू झाल्यानंतर अवघ्या 48 महिन्यांमध्ये म्हणजेच तीन वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल अशी माहिती सुद्धा समोर येत आहे. या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नाशिक ते पुणे हा पाच तासांचा प्रवास दोन तासांनी कमी होणार आहे. म्हणजे याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे ते नाशिक अवघ्या तीन तासांमध्ये कव्हर करता येईल असा आशावाद व्यक्त केला जातोय.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!