सोन्याच्या किमतीत अचानक मोठी वाढ! 8 जुलै 2025 रोजी 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत, महाराष्ट्रातील 18, 22 आणि 24 कॅरेटचे रेट पहा…

सोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आज पुन्हा या मौल्यवान धातूची किंमत वाढली असून आज आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट पाहणार आहोत.

Published on -

Gold Rate Today : काल महाराष्ट्राचे संपूर्ण देशभरात 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत घसरण पाहायला मिळाली. सात जुलै 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याचे रेट दहा ग्रॅम मागे पाचशे रुपयांनी कमी झालेत, तर दुसरीकडे 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत दहा ग्रॅम मागे 540 रुपयांनी कमी झाली आहे. त्याआधी पाच जुलै रोजी सोन्याच्या किमतीत थोडीशी वाढ झालेली होती. दरम्यान आज पुन्हा एकदा म्हणजेच 8 जुलै 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. या मौल्यवान धातूच्या 18, 22 आणि 24 कॅरेट च्या किमतीत आज वाढ झाली असल्याची बाब निदर्शनास आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याच्या किमती कशा आहेत याचा आढावा या लेखातून घेणार आहोत.

आज किमती किती वाढल्या?

मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्यातील मुंबई नाशिक पुणे नागपूर ठाणे कोल्हापूर जळगाव वसई विरार भिवंडी लातूर यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 410 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत पाचशे रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 550 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी वाढली आहे. यामुळे सोने खरेदीच्या तयारीत असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना याचा मोठा फटका बसणार आहे तर दुसरीकडे सोन्यामध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांसाठी ही एक दिलासादायी बातमी राहणार आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट

18 कॅरेटचे रेट : आज आठ जुलै 2025 रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,130 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 74,160 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

22 कॅरेटचे रेट : आज आठ जुलै 2025 रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,600 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,630 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

24 कॅरेटचे रेट : आज 8 जुलै 2025 रोजी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 98,840 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली. तसेच नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी या प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 98,870 रुपये प्रति ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!