ऐकावं ते नवलंच! चक्क आयुष्यभर अंघोळ करत नाही, तरीही ‘या’ देशातील महिला सौंदर्यात आघाडीवर, नेमकं काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट?

Published on -

आपल्याला नेहमीच वाटतं की सौंदर्य आणि स्वच्छता यासाठी दररोज आंघोळ करणं, महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरणं आणि ताजेपणाचा अनुभव घेणं आवश्यक असतं. पण या सगळ्या कल्पनांना धक्का देणारी एक जगावेगळी परंपरा आफ्रिकेच्या वाळवंटात आजही जगते. नामिबियामधील हिम्बा जमातीच्या महिला कधीही पारंपरिक अर्थाने आंघोळ करत नाहीत, तरीही त्यांचं सौंदर्य असं काही विलक्षण असतं की ते पाहणाऱ्याच्या नजरा स्तब्ध होतात.

हिम्बा जमात

हिम्बा जमात ही आफ्रिकेतील एक अर्धवाळवंटी भागात राहणारी पारंपरिक जमात आहे. या भागात पाणी इतकं दुर्मिळ आहे की ते प्राधान्याने शेतीसाठी, जनावरांसाठी आणि पिण्यासाठी राखून ठेवलं जातं. त्यामुळे या महिलांनी आपली जीवनशैलीच वेगळी स्वीकारली आहे.

त्या शरीरावर पाणी न ओतता स्वतःची स्वच्छता धूर, गंध आणि मातीच्या मिश्रणानं करतात. त्या ‘ओटजीजे’ नावाच्या लालसर पेस्टचा वापर करतात, जी गेरू आणि प्राण्यांच्या चरबीपासून बनलेली असते. ही पेस्ट केवळ त्यांना सुंदरच दाखवत नाही, तर ती त्यांना सूर्याच्या झळांपासून आणि कीटकांपासूनही वाचवते.

हिम्बा महिलांची त्वचा नेहमीच लालसर व झळाळती दिसते आणि त्यांचे केस कलात्मक पद्धतीने गुंफलेले असतात. केसांची ही बांधणी केवळ शोभेसाठी नसते, तर ती त्यांच्या सामाजिक स्थानाचं, वयाचं आणि वैवाहिक स्थितीचं प्रतीक असते. अशा प्रकारे सौंदर्य आणि परंपरा दोन्ही हातात हात घालून चालतात.

पारंपरिक अंघोळीच्या ऐवजी, त्या एक विशेष वनस्पती ओमुजुम्बाजुंबची पाने जाळतात आणि त्या धुरात स्वतःला स्नान घालतात. हा धूर त्यांच्या शरीरावर आणि कपड्यांवर सुगंधाचा थर सोडतो, आणि त्यांच्या आजूबाजूचा वाससुद्धा प्रसन्न ठेवतो. स्वच्छतेच्या या पद्धतीकडे बाहेरून पाहताना ते अजब वाटेल, पण प्रत्यक्षात ही पद्धत त्यांच्या हवामान आणि जीवनशैलीशी अतिशय सुसंगत आहे.

विचित्र सामाजिक परंपरा

या जमातीतील आणखी एक सामाजिक परंपरा, जी अनेकांना धक्का देणारी वाटू शकते. म्हणजे पाहुण्यांचं आदरातिथ्य करण्याची त्यांची विशिष्ट पद्धत. जर घरात कोणी महत्त्वाचा पाहुणा आला, तर घरातील पुरुष आपल्या पत्नीला त्या पाहुण्यासोबत रात्र घालवण्याची परवानगी देतो. या परंपरेला आपल्याकडून ‘अनीती’ म्हणून पाहण्याऐवजी, त्या समाजाच्या संकल्पनांमधून समजून घेणं गरजेचं आहे. कारण त्यांच्या दृष्टीने हे पाहुणचाराचं एक अत्युच्च रूप आहे. जिथे आपुलकी, आदर आणि मान्यता यांचा मिलाफ असतो.

हिंबा महिलांच्या सौंदर्याचा लौकिक जगभर पोहोचला आहे. त्यांचं लालसर शरीर, आकर्षक वेणी, आत्मविश्वासाने भरलेलं व्यक्तिमत्त्व आणि जगाला वेगळ्या नजरेने पाहणारी परंपरा यामुळे ही जमात कायमच चर्चेत असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!