नशीब पालटणारे जादुई ब्रेसलेट, हातात धारण केल्यास पडेल पैशांचा पाऊस! जाणून घ्या त्याचे फायदे

Published on -

पैसा येतो आणि जातो, पण काही लोकांच्या बाबतीत तो थांबतच नाही जणू त्यांच्या जीवनात लक्ष्मीचा वासच नसतो. अनेकदा आपणही असा विचार करतो की एवढं कष्ट करूनही आर्थिक स्थिरता का मिळत नाही? पैसा हातात येतो खरा, पण टिकत नाही, आणि मनात एक अढीच राहते. अशा वेळी काही लोक श्रद्धेच्या आधारे असे उपाय करतात, जे त्यांना मानसिक आधार देतात आणि आत्मविश्वासात भर घालतात. अशाच एका उपायाचा भाग म्हणजे ‘रिची रिच कॉम्बो ब्रेसलेट’.

‘रिची रिच कॉम्बो’ ब्रेसलेट

या ब्रेसलेटबाबत सध्या सोशल मीडियावर आणि बाजारात बरीच चर्चा आहे. काहींच्या मते हे ब्रेसलेट केवळ सौंदर्यवर्धक दागिना नाही, तर एक शुभचिन्ह आहे, जे आर्थिक उन्नतीला चालना देतं. ‘रिची रिच कॉम्बो’ या नावाचाच आशय आहे समृद्धी आणि भरभराटीची दिशा. हे ब्रेसलेट दोन विशिष्ट दगडांचा संगम असतो, जे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात आणि लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा म्हणून घातले जातात.

अनेक वापरकर्ते सांगतात की हे ब्रेसलेट घातल्याने त्यांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये स्थिरता आली, अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मिळालं आणि मन शांत झालं. जेव्हा पैसा टिकायला लागतो, तेव्हा आपोआप आत्मविश्वासही वाढतो. निर्णय घेणे सोपे वाटते, मानसिक गोंधळ कमी होतो. बरेच वेळा यशाची सुरुवात मनाच्या शांततेने होते आणि कदाचित हे ब्रेसलेट त्यासाठीच एक माध्यम ठरतं आहे.

ब्रेसलेट घालण्याच्या पद्धती

हे ब्रेसलेट घालण्यामागे काही विशिष्ट पद्धती सांगितल्या जातात. सकाळी, विशेषतः शुक्रवारच्या दिवशी, स्नान करून, एक चिमूटभर मीठ पाण्यात मिसळून त्यात ब्रेसलेट भिजवायचं असतं. त्यानंतर लक्ष्मीमंत्राचा 11 वेळा जप करायचा “ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः” आणि त्यानंतर ब्रेसलेट उजव्या किंवा डाव्या हातात घालायचं. या प्रक्रियेचा उद्देश म्हणजे श्रद्धेने मनात सकारात्मकतेचा संचार करणे.

हे सर्व ऐकून तुमच्याही मनात प्रश्न उभा राहू शकतो हे खरंच कार्यरत आहे का? यामागे कोणतं विज्ञान आहे? तर उत्तर अगदी सरळ आहे, अशा उपायांमागे श्रद्धा असते. यश मिळवण्यासाठी केवळ ब्रेसलेट पुरेसं नाही, पण हे तुमच्या मनाला एक आधार देऊ शकतं, जसं एखादी शुभ चिन्हं देतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!