अंकशास्त्र ही एक अशी रहस्यमय शाखा आहे, जी फक्त आकड्यांचा खेळ नसून मानवी स्वभाव, नशीब आणि जीवनातील घटनांचा आरसा ठरते. काही लोकांचे आयुष्य अगदी राजासारखे असते. ऐश्वर्याने भरलेले, स्टाईलने झळकणारे आणि पैशाच्या बाबतीत थाटात वावरणारे. अशा व्यक्तींच्या जीवनात एक सामान्य धागा असतो, तो म्हणजे त्यांचा मूलांक. आणि जर तो मूलांक 3 असेल, तर त्यांच्या हातून केवळ सोनंच नाही, तर इतरांनाही श्रीमंतीचा सुवर्णस्पर्श मिळतो, असे म्हटले जाते.

मूलांक 3
ज्यांचा जन्म महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला झाला आहे, त्यांच्या आयुष्यावर गुरू ग्रहाचा प्रभाव असतो. गुरू हा ज्ञान, समृद्धी, राजसत्ता आणि धर्माचा प्रतीक मानला जातो. त्यामुळे मूलांक 3 असलेल्या व्यक्तींमध्ये नैसर्गिक तेज, बोलण्यात स्पष्टता, आणि स्वतःभोवती एक वेगळा वलय असतो. ते जिथे जातात, तिथे लोक त्यांच्या स्टाईलकडे पाहतात, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देतात आणि नकळत त्यांच्याकडे आकर्षित होतात.
हे लोक संवादात इतके प्रभावी असतात की, अगदी काठावरून फिरणारी संधीही त्यांच्या शब्दांमुळे सुवर्णमौका बनते. ते उत्तम वक्ते असतात, उत्तम विक्रेते असतात आणि त्यांचं आत्मभान इतकं ठाम असतं की कोणतीही सभा ते सहजपणे आपल्या बाजूने झुकवू शकतात.
स्वभाव आणि गुण
मात्र त्यांचं वैयक्तिक आयुष्य थोडं उथळ असतं. प्रेमात ते फारशे स्थिर राहत नाहीत. नात्यांमध्ये स्वतःच्या अटी असणं त्यांचं वैशिष्ट्य असतं, पण हेच कधी कधी नातं तोडतं. ते उशिरा लग्न करतात, आणि प्रेमसंबंधांमध्ये 1, 5 आणि 6 या मूलांकांशी जास्त जुळतात. त्यांच्यात कधी हट्टीपणा आणि थोडासा अहंकारही जाणवतो, जो नात्यांमध्ये ताण निर्माण करू शकतो.
पैशाच्या बाबतीत, ते नशिबवान असतात. तसंच ते ज्या लोकांशी संबंध ठेवतात, त्यांच्याही नशिबात धनप्राप्ती होते. त्यांच्या हातात एखादा जादूई स्पर्श असतो, जो दुसऱ्यांचंही नशीब फळफळतं करतो. म्हणूनच काही ज्योतिष सांगतात की मूलांक 3 असलेल्या लोकांनी जपूनच व्यवहार करावेत, कोणाशीही सहज हस्तांदोलन करू नये, कारण त्यांच्या उर्जेमुळे इतरांचे भाग्य बदलते.
विशेष उपाय
या मूलांकाचा भाग्यवान रंग पिवळा, सोनेरी आणि लाल आहेत, आणि गुरुवार हा त्यांचा विशेष दिवस. पिवळा नीलम हा त्यांच्यासाठी शुभ रत्न मानला जातो. जेव्हा हे लोक गुरुवारी गरिबांना हळद, हरभरा डाळ यांसारख्या गोष्टी दान करतात, किंवा “ॐ बृं बृहस्पतये नम:” हा मंत्र म्हणतात, तेव्हा त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि समृद्धीचे दरवाजे उघडतात.