भगवान गणेश हे केवळ विघ्नहर्ता नव्हे, तर भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करणारे दयामूर्ती आहेत. त्यांचं प्रत्येक रूप वेगळी ऊर्जा आणि आशीर्वाद घेऊन येतं. जीवनात सुख, शांती, यश आणि समृद्धी हवी असेल, तर गणेशाची पूजाही आपण इच्छेनुसार, त्यांच्या योग्य स्वरूपात करावी लागते. आज आपण जाणून घेणार आहोत, गणेशाचे अशी 8 रूपं जी घरात ठेवली, तर अनेक अडथळे दूर होतात आणि तुमचं कार्य निश्चितच सिद्धीस जातं.
बाल गणेश

सर्वात पहिले रूप म्हणजे बाल गणेश. या निरागस रूपातून प्रेम, शुद्धता आणि बालकांचं संरक्षण व्यक्त होतं. घरात लहान मुलं असतील आणि त्यांच्या आरोग्याबाबत, शिक्षणाबाबत चिंता वाटत असेल, तर बाल गणेशाची मूर्ती घरात ठेवल्याने आई-वडिलांच्या मनाला एक वेगळाच दिलासा मिळतो. मुलांचं मन शांत, एकाग्र होतं आणि त्यांच्या भोवती एक सुरक्षित ऊर्जाक्षेत्र तयार होतं.
डाव्या सोंडेचा गणेश
डाव्या सोंडेचा गणेश घरात सौम्यता आणि समजूतदारी घेऊन येतो. घरात सतत वाद होतात, छोट्या गोष्टींवरून वाद वाढतो, असा अनुभव जर तुम्हाला आला असेल, तर हे रूप घरात जरूर ठेवा. या गणेशाची नजर नेहमी सौहार्द राखते आणि भावनिक गुंतागुंत शांत करण्याचं काम करते.
मोदक असलेला गणेश
मोदक असलेला गणेश तुम्हाला सांगतो की जीवनात गोडवा आणि संतुलन हवेच. याचे रूप केवळ विद्यार्थ्यांसाठीच नाही, तर आत्मसंतुलन शोधणाऱ्यांसाठीही प्रेरणादायी आहे. अध्यात्म आणि ज्ञान यात समतोल हवा असेल, तर ही मूर्ती घरात ठेवावी.
उंदरावर बसलेला गणेश
उंदरावर बसलेला गणेश ही नम्रतेची शिकवण देतो. कामात वारंवार अडचणी येत असतील, यश समोर असूनही हातात येत नसेल, तर या रूपाने सकारात्मक ऊर्जा पुन्हा प्रवाहित होते. मुख्य दरवाजाजवळ ही मूर्ती ठेवली की, एक प्रकारचं संरक्षण कवच तयार होतं.
लाल रंगातील गणेश
लाल रंगातील गणेश ही लक्ष्मीच्या स्वागताची खूण आहे. आर्थिक अडचणी, आत्मविश्वासाचा अभाव आणि मनात खचलेपणाची भावना असेल, तर हे रूप तुमच्यासाठी आदर्श ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे विशेष फलदायी आहे.
पांढऱ्या गणेशाचं रूप
पांढऱ्या गणेशाचं रूप विशेषतः त्या घरांसाठी आहे जिथे सतत तणाव, बेचैनी आणि मानसिक थकवा जाणवतो. पांढरट रंग, साधेपणा आणि या मूर्तीभोवतीची शांत ऊर्जा घरात एक वेगळं सौम्य वातावरण निर्माण करते.
मुख्य दारावर गणेशाचं रूप ठेवणं म्हणजे दररोज तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक आशीर्वाद घेऊन उभं असणं. अशा गणेशामुळे घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि आत येणारी प्रत्येक गोष्ट एक शुभतेचा संदेश घेऊन येते.
रिद्धी-सिद्धीसह असलेला गणेश
शेवटी, रिद्धी-सिद्धीसह असलेला गणेश म्हणजे जीवनातील प्रत्येक यश, प्रेम आणि सौख्याचं प्रतीक. जेव्हा नवविवाहित जोडपं एकत्र राहतं, जेव्हा कुटुंबात आर्थिक आणि मानसिक स्थैर्य हवं असतं, तेव्हा हे रूप एकतर्फी समाधान देत नाही, ते समृद्ध आयुष्याचा मार्ग उघडतं.