अहिल्यानगर पोलिस मुख्यालयात ड्युटीला असणारा पोलिस अंमलदार दोन दिवसांपासून बेपत्ता, तोफखाना पोलिसांत घटनेची नोंद

Published on -

अहिल्यानगर- पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार बेपत्ता झाले आहेत. जयराम बाजीराव काळे (वय ३४ रा. कजबे वस्ती, तपोवन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) असे बेपत्ता झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. याबाबत त्यांच्या पत्नी आश्विनी जयराम काळे यांनी
तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

अंमलदार जयराम काळे हे पोलीस मुख्यालयात नेमणुकीला आहेत. ते सोमवारपासून (दि. ७) बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत.

त्यानंतर त्यांची पत्नी आश्विनी यांनी मंगळवारी (दि. ८) सकाळी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली असून अंमलदार काळे यांचा शोध सुरू केला आहे. ते बेपत्ता होण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस अंमलदार रमेश थोरवे तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!