भंडारदरा – तालुक्यातील भंडारदरा धरण परिसरात सध्या पावसाळ्यामुळे पर्यटकांची गर्दी होत आहे; मात्र निसर्ग सौंदर्य अनुभवताना अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकत नसल्याचे चित्र आहे.
या उतावळेपणामुळे अपघातांची शक्यता निर्माण होत आहे. धरणाच्या सांडव्यामधून प्रवरा नदीत सोडण्यात आलेल्या विसर्गाचे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर सांडव्याभोवती जमू लागले आहेत.

सांडव्यामधून कोसळणाऱ्या पाण्याचा मनमोहक प्रवाह अनेकांना आपल्या मोबाईलमध्ये टिपायचा मोह होतो आहे. मात्र, या भागातील काही ठिकाणे अतिशय धोकादायक असून, तिथे उभे राहून सेल्फी काढणे जीवावर बेतण्यासारखे आहे.
याच पार्श्वभूमीवर भंडारदरा धरण शाखा व राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी पर्यटकांना शांततेत निसर्गाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. धोकादायक
भागात जाऊन फोटो व सेल्फी काढण्याचा मोह टाळावा, असे सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस सक्रीय झाल्याने खरीप पिकांना दिलासा मिळाला. मागील चोवीस तासांत जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात कमी अधिक स्वरूपाचा पाऊस झाला. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ५.६ मिमी, तर आतापर्यंत ९७. मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ७७टक्क्यांवर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला आहे.