कोपरगाव- येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत समृद्धी महामार्गावरील कोपरगाव शिर्डी एक्सचेंज येथे राखाडी रंगाच्या आयशरमधून सुमारे ६४ लाख ८० हजार रुपयांचा प्रतिबंधीत सुंगधी तंबाखुचा गुटखा पकडला. यावेळी पोलिसांनी १२ लाखाच्या आयशर टेम्पोसह ७७ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आयशर चालकाला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावरील कोपरगाव शिर्डी एक्सचेंज -येथे काल मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना तेथे राखाडी रंगाचा (एम. एच. ४६ बी.बी. ८०९८) क्रमांकाच्या आयशरमधून सुमारे ६४ लाख ८० हजारांचा गुटखा व सुगंधी तंबाखू, १२ लाखाचा आयशर, असा एकूण ७६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तसेच आयशर चालक अकील रमजान शेख (वय ४२, रा. अदिलाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी वेषांतर करून आपल्या विशेष पथकाच्या मदतीने ही कारवाई केली. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम
होते.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, अहिल्यानगर शहर विभाग, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर कारखेले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद भिंगारदिवे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय साठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मल्लिकार्जुन बनकर व पोलीस कॉन्स्टेबल अमोल कांबळे,
तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुनिल दिघे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी बोराडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल विजय ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल जालिंदर दहिफळे यांनी केली. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईने अहिल्यानगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुक्यातील अवैध धंद्याचे चांगलेच धाबे दणाणले आहे.