जामखेड पोलिसांचा वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांना दणका, अट्टल गुन्हेगारांचा बिमोड करण्याचाही दिला इशारा

Updated on -

जामखेड- पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी फॅन्सी नंबर प्लेट लावणारे तसेच वाहतुकीचे नियम पायदळी तुडवण्याऱ्यांवर धडक कारवाई केली. या कारवाईमुळे नियम मोडणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडली आहे.

पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, पोलीस अंमलदार प्रकाश जाधव, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, पोलीस अंमलदार अमोल आजबे, पोलीस अंमलदार प्रणव चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश दळवी, होमगार्ड रफीक तांबोळी, पवार यांच्या पोलीस पथकाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी खर्डा चौकामध्ये नाकाबंदी करुन विना परवाना गाडी चालवणे व वाहनाच्या गाडीच्या काळ्या रंगाच्या काचा असणाऱ्या वाहनावर धडक कारवाई करण्यात आली. या धडक कारवाईमुळे जामखेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

जामखेड पोलीस स्टेशनला हजर झाल्यापासून तालुक्यातील व शहरामध्ये मटका, मावा, जुगार, गुटखा, शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालण न करणाऱ्या कला केंद्रावर आणि अवैधरीत्या चालणारे धंदे बंद करण्यात आले आहेत. तसेच गुन्हेगारांचा गर्दनकाळ ठरलेले पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवल्या आहेत. या पुढील काळात देखील अट्टल गुन्हेगारांचा बिमोड करणार.- पोलीस निरीक्षक चौधरी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!