Government Employee News : केंद्रीय सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा कोरोना काळातील मार्च 2020 ते जून 2021 या कालावधीमधील थकीत महागाई भत्ता देणे बाबत केंद्रातील सरकारकडून एक महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारक कोरोना काळातील या थकीत 18 महिन्यांच्या महागाई भत्ता थकबाकीची गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मागणी करत आहेत. मात्र अजून यासंदर्भात सरकारकडून सकारात्मक निर्णय झालेला नाही.

18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी मिळणार का?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कोरोना महामारीच्या काळांमध्ये संपूर्ण देशात लॉकडाऊन लागले होते. यामुळे संपूर्ण देशात उद्योगधंदे ठप्प होते. यामुळे त्या काळात सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या डी.ए वाढ मध्ये सुद्धा कपात करण्यात आली होती.
मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळ निघून गेल्यानंतर संबंधित कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकीचा लाभ मिळणार अशी आशा होती. पण सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना सदर डीए वाढ नंतर लागुच करण्यात आलेली नाही.
दरम्यान, आता याच संदर्भात सरकार मार्फत आयोजित केंद्रीय कर्मचारी परिषदेच्या बैठकीत सदर विषयावर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यात 18 महिने थकीत डीए बाबत सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. यावर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरणे देण्यात आले आहे.
सरकारची भूमिका काय ?
कोरोना काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी अगदीच बिकट परिस्थिती असतानाही प्रामाणिकपणे आपल्या कर्तव्याचे पालन केले. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात अविरतपणे सेवा बजावली. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकी मिळायला हवी होती.
मात्र अजूनही सरकारकडून त्या 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देण्यात आलेली नाही आणि म्हणूनच या थकबाकीच्या मागणीसाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा सरकारने यावर आपली भूमिका क्लियर केली आहे.
केंद्रातील सरकारने कोरोना काळांमध्ये सरकारची आर्थिक स्थिती अधिकच बिकट होती, तसेच उपलब्ध निधी हा कोराना महामारी निर्मुलन करीता वापरण्यात आला होता, यामुळे कोरोना काळातील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देता येणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.