स्मार्टफोन घेताना बजेट कमी असेल आणि फीचर्स मात्र जबरदस्त हवे असतील, तर तुम्हाला ही बातमी खूपच उपयोगी ठरू शकते. कारण आता फक्त 6,499 रुपयांपासून सुरू होणाऱ्या किंमतीत जबरदस्त फोन बाजारात आले आहेत, जे एकूण 12GB रॅमसह मिळतात. म्हणजेच मोठ्या गेम्सपासून मल्टीटास्किंगपर्यंत सर्व गोष्टी सहज हाताळता येतील तेही सगळं 10,000 रुपयांच्या आत.

या स्मार्टफोन्समध्ये बेसिक रॅम 4GB किंवा 6GB आहे, पण त्यात व्हर्च्युअल रॅम टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. म्हणजे तुमचा फोन गरजेनुसार स्टोरेजचा थोडा भाग ‘रॅम’ म्हणून वापरतो आणि एकूण रॅम 12GB पर्यंत वाढवतो. त्यामुळे फोन अधिक स्मूद आणि वेगवान चालतो.
itel Zeno 10
या यादीतला सर्वात स्वस्त आणि चर्चेत असलेला फोन म्हणजे itel Zeno 10. याची किंमत फक्त 6,499 रुपये आहे आणि तो Amazon वर सहज उपलब्ध आहे. या फोनमध्ये 4GB बेसिक रॅम असून, कंपनी 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमचा पर्याय देते. त्यामुळे एकूण 12GB रॅमचा अनुभव मिळतो. या फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर, एचडी+ डिस्प्ले आणि 8 मेगापिक्सेलचा AI ड्युअल कॅमेरा आहे, जो सामान्य वापरासाठी अगदी योग्य आहे.
Lava Blaze 2 5G
दुसऱ्या क्रमांकावर येतो Lava चा Blaze 2 5G. यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असून, व्हर्च्युअल रॅमने एकूण रॅम 12GB पर्यंत वाढते. या फोनची किंमत आहे 9,169 रुपये. Lava ने या बजेट फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा शक्तिशाली AI कॅमेरा दिला आहे आणि 5,000 mAh क्षमतेची बॅटरीही उपलब्ध आहे. तसेच 90Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले याला अधिक आकर्षक बनवतो.
Motorola G35 5G
तिसरा पर्याय म्हणजे Motorola चा G35 5G. फ्लिपकार्टवर 9,999 रुपयांना मिळणाऱ्या या फोनमध्ये 4GB रॅम असून, रॅम बूस्ट तंत्रज्ञानामुळे यामध्येही 12GB रॅमचा अनुभव मिळतो. फोन युनिसॉक T760 प्रोसेसरवर चालतो आणि यात 6.72 इंचाचा 120Hz रिफ्रेश रेटचा मोठा डिस्प्ले दिला आहे. मुख्य कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा असून, 16 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा यामध्ये आहे.