पावसाळ्याच्या संध्याकाळी गरम चहा आणि नेटफ्लिक्सवर एखादा जबरदस्त चित्रपट पाहणे, यापेक्षा आरामदायक गोष्ट कोणती असू शकते? तुम्हीही असंच काहीतरी शोधत असाल, तर सध्या नेटफ्लिक्सवर भारतात कोणते चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत, याची यादी नक्कीच तुमच्यासाठी उपयोगी ठरेल.
‘ठग लाईफ’

आज म्हणजे 9 जुलै 2025 रोजी नेटफ्लिक्सवर जे टॉप 10 चित्रपट ट्रेंडमध्ये आहेत, त्यात पहिल्या क्रमांकावर कमल हासनचा ‘ठग लाईफ’ आहे, जो अॅक्शन आणि ड्रामाचं मिश्रण आहे. IMDb रेटिंग जरी 4.2 असलं तरी प्रेक्षक त्याला भरपूर पसंती देत आहेत.
‘रेड 2’
दुसऱ्या स्थानी आहे ‘रेड 2’. अजय देवगण आणि रितेश देशमुख या दोघांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट एक राजकीय थ्रिलर असून IMDb वर 6.8 चं रेटिंग मिळवलेलं आहे. काहीसं गंभीर पण प्रभावी कथानक त्यामागे आहे.
‘ओल्ड गार्ड 2’
तिसऱ्या क्रमांकावर अमेरिकन सुपरहिरो जगतातील ‘ओल्ड गार्ड 2’ झळकत आहे. रेटिंग 5.1 असूनही, अॅक्शनप्रेमींना ही मालिका खूप आवडतेय. आणि याचाच पहिला भाग ‘ओल्ड गार्ड’ सहाव्या क्रमांकावर आहे, ज्याचं IMDb रेटिंग 6.7 आहे.
‘लाइफ इन अ मेट्रो’
या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेला ‘लाइफ इन अ मेट्रो’ हा चित्रपट मात्र एक वेगळंच स्थान मिळवतो. इरफान खानचा अभिनय, शहरात राहणाऱ्या माणसांच्या गुंतागुंतीच्या नात्यांची सुंदर मांडणी आणि अनुराग बासूचं दिग्दर्शन या सगळ्यामुळे हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आजही लोकांच्या मनाला भिडतोय. IMDb वर त्याला 7.4 चं रेटिंग मिळालंय, जे या यादीतील सर्वोत्तम रेटिंगपैकी एक आहे.
इतर चित्रपट
पाचव्या स्थानी तेलगू अॅक्शन थ्रिलर ‘हिट द थर्ड केस’ आहे, ज्याचं IMDb रेटिंग 6.9 आहे. तर सातव्या स्थानी सनी देओलचा ‘जाट’ आहे, ज्याला 6 रेटिंग मिळालंय. आठव्या स्थानी ‘के-पॉप डेमन हंटर्स’ आहे, ज्याने आशियाई पॉप संस्कृती आणि अॅनिमेशनचा संगम करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याला IMDb वर 7.8 चं भक्कम रेटिंग मिळालं आहे.
नवव्या स्थानावर ‘द डिप्लोमॅट’ आहे, ज्यात जॉन अब्राहमचा गंभीर आणि राजकीय अंगाने झुकलेला अभिनय दिसून येतो. IMDb रेटिंग 7 असून हा चित्रपट एक वेगळीच कथा मांडतो. शेवटी, दहाव्या स्थानावर आहे ‘सिकंदर’ सलमान खानचा अॅक्शनपट. IMDb रेटिंग 3.7 असलं तरी फॅन्सनी त्याला नेटफ्लिक्सवर टॉप 10 मध्ये पोहोचवलं आहे.