निकृष्ट दर्जाच्या ‘पॅच अप’ मुळे वाहनधारकांना होतोय मनस्ताप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते.

नागरिकांचा जीव गेला तरी प्रशासनाला मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीचे काही घेणे देणे राहिलेले नाही. मात्र याच नादुरुस्त रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

दरम्यान नगर ते वडाळा या अंतरातल्या नगर-औरंगाबाद महामार्गाची अक्षरश: चाळण झालीय. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रासले आहे.

खड्डे पडले कि हे खड्डे बुजविण्यासाठी सतत सुरु असलेलं निकृष्ट दर्जाचं ‘पॅच अप’ हे देखील वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

विशेष म्हणजे ‘अशोका’ या ठेकेदार कंपनीच्यावतीने या महामार्गावरचे मोठमोठे खड्डे चक्क पावसाळ्यात बुजविले. त्यामुळे राॅकेलमिश्रित डांबर ताबडतोब वाहून गेले आणि महामार्गावर पुन्हा खड्ड्याचं साम्राज्य निर्माण झालं.

अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम साहित्य वापरण्यात आल्यानं या महामार्गाचं आयुष्य अत्यल्प ठरलं. या महामार्गाला संबंधित ठेकेदार कंपनीच्यावतीने जागोजागी ‘ठिगळे’ लावण्याचा केविलवाणे प्रयत्न सुरु आहेत.

मात्र या डागडुजीमुळे दुचाकी वाहनचालकांच्या डोळ्यात धूळ जात असून या खड्ड्यांमुळे या वाहनांचं मोठं नुकसान होत आहे.

या महामार्गाचं निकृष्ट काम करणार्‍या ठेकेदार कपनीला काळ्या यादीत टाकण्यात यावं, अशी मागणी जनतेमधून करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment