पारनेर तालुक्यात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाचा छापा, ५ लाखांचा गुटखा केला जप्त

Published on -

अहिल्यानगर- पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाचे प्रमुख उपअधीक्षक संतोष खाडे यांनी पारनेर व बेलवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी छापे घालून सुमारे पाच लाख ५२ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त केला. चारचाकी वाहने हस्तगत करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे ७ जुलै २०२५ पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना माहिती मिळाली की, निघोज ता. पारनेर बस बसस्थानकासमोरील रस्त्यावरुन मोटारकारमध्ये एक व्यक्ती गुटखा वाहतूक करणार आहे. त्यानुसार पोलिस पथकाने संशयित मोटारकार ताब्यात घेऊन चालक अक्षय भास्कर लाळगे वय २७ रा. लाळगे मळा, निघोज ता. पारनेर जि. अहिल्यानगर याला ताब्यात घेतले.

मोटारकारीतून चार लाख ८६ हजार ९८६ रुपयांचा विविध कंपन्याचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त केली. मोटारीतील मुद्देमाल आतिक उर्फ डॉन मोहम्मद शेख (रा. भिंगार ता. नगर जि. अहिल्यानगर (फरार) व इशान जाकीर शेख (रा. गजानन कॉलनी, फकीर वाडा ता. जि. नगर (फरार) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. याबाबत पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या कारवाईत पोलिस पथकाने गव्हाणवाडी ता. श्रीगोंदा येथे करण भरत काळे व अनिकेत सोनवणे दोघे घराच्या आडोशाला पान मसाला, गुटखा, सुगंधीत तंबाखूची साठवणूक करीत ठेवत आहेत.

त्यानुसार पोलिस पथकाने गव्हाणवाडी येथे छापा घातला असता पोलिस आल्याची चाहूल लागताच करण काळे व अनिकेत सोनवणे दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.

पथकाने त्यांच्या घराच्या परिसराची झडती घेतली असता ६६ हजार ६९४ रूपयांची सुगंधी तंबाखू, गुटखा पानमसाला जप्त केला. याप्रकरणी करण भरत काळे रा. सोनलकर वस्ती गव्हाणेवाडी, अनिकेत सोनवणे (दोघे फरार) रा. ढवळगाव ता. श्रीगोंदा यांच्याविरुद्ध बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दोन्ही कारवाई पाच लाख ५२ हजार ८८० रुपयांचा गुटखा जप्त केला. चारचाकी वाहने हस्तगत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!