अहिल्यानगर- कोतवाली पोलिसांनी बुरूडगाव रस्त्यावरील नक्षत्र लॉनजवळील समर्थनगर येथे एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्डूयावर छापा घालून १५ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून जुगारचे साहित्यासह ३० लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुदेमाल हस्तगत केला.
याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना ८ जुलै २०२५ रोजी सायंकाळी माहिती मिळाली, शहरातील लंकेश हर्षा यांच्या खोलीत, समर्थनगर, नक्षत्र लॉन, बुरुडगाव रोड येथे काही व्यक्ती जुगार खेळत आहेत.

त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांना पोलीस पथकासह जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस पथकान बुरुडगाव रस्ता परिसरात खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा घातला. १५ जुगाऱ्यांना जागेवर ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, १५ मोबाईल फोन, ३ चारचाकी वाहने व ३ मोटारसायकल असा ३० लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
वरील पंधरा जणांविरोधात पोलिस कॉन्स्टेबल महेश सुभाष पवार यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड करीत आहे. ही कारवाई पोलिस अंमलदार बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, विक्रम वाघमारे, सूर्यकांत डाके, सत्यजीत शिंदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, प्रतिभा नागरे यांच्या पथकाने केली.